कोरोनामुळे दोघांचा बळी !१९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
पिंपरी चिंचवड ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पिंपरी -: पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भोसरीतील कोरोनाबाधित महिलेचा मंगळवारी महापालिका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेचे वय ४० होते. ही महिला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून कामाला होती. शहरातील सहा जणांचा मंगळवारपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यातील आठ जणांचा महापालिका रुग्णालयात अशा १४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर, कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील आणखी तिघांचे मंगळवारी कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, भोसरी, रुपीनगरमधील तिघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय हद्दीबाहेरील १२,अशा १९ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
भोसरी परिसरात राहणारी ही महिला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात आया म्हणून नोकरीला होती. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. महिलेवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. यासह आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील कोरोना बळींचा आकडा सहावर गेला आहे.
महापालिकेने कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट मंगळवारी आले. त्यामध्ये कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
तसेच भोसरी, रुपीनगरमधील तिघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 78 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. 60 वर्षीय आणि 31 वर्षीय महिलेचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय हद्दीबाहेरील 12 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात आतापर्यंत 233 जणांना कोरोनाची झाला आहे. तर 132 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भोसरीतील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील पाच आणि महापालिका हद्दीबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात आठ अशा 13 जणांचा मंगळवारपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे