
*पेठ वडगांव मधे सलून दुकाने मागितली सुरू करणेसाठी केली मागणी.*
कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-शासनाच्या नियमानुसार वडगांव मधे सलून दुकाने सुरू करणेसाठी परवानगी मिळावी यासाठी नाभिक समाजाचे शहर अध्यक्ष शरद काशिद यांनी नगराध्यक्ष मोहन माळी यांच्या कडे निवेदन दिले.
गेल्या ५७ दिवसापासून लाॅकडाॅऊन मुळे सलून दुकाने बंद आहेत.
या नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाने चौथ्या लाॅकडाॅऊन मधे ऑरेंज आणि ग्रीण झोण मधे सलून दुकाने सुरू करणेसाठी परवानगी दिली असून त्यानुसार पालिकेने वडगांव मधे सलून दुकाने सुरू करणेसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.