
- *नांदेड कोविड” आता पर्यंत २ हजार ४२० नमुने निगेटिव्ह तर ८२ अहवाल प्रलंबित ; ९७ रुग्ण पॉझिटिव्ह ; कोरोना मुक्त एकुण ३० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी*
*नांदेड, दि. १८ : राजेश एन भांगे*
कोरोना विषाणु संदर्भात सोमवार 18 मे रोजी सायं 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 19 हजार 611 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून एकुण 2 हजार 702 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 420 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून एकुण 182 चा अहवाल प्रलंबित आहे. यात घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी 97 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 30 रुग्णांना कोरोना या आजारापासून मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.उपचार सुरु असलेल्या 60 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 48 रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये 2 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे. औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
जनतेनी अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
• आत्तापर्यंत एकूण संशयित – 2581, • एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2350, • क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 1009, • अजून निरीक्षणाखाली असलेले – 196, • पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -59, • घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2291, • एकुण नमुने तपासणी- 2702, • एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 97, • पैकी निगेटीव्ह – 2302, • नमुने तपासणी अहवाल बाकी- 182, • नाकारण्यात आलेले नमुने – 14
• अनिर्णित अहवाल – 104, • कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5, • जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 19 हजार 611 यांना घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.