Home महाराष्ट्र संपादकीय अग्रलेख…

संपादकीय अग्रलेख…

120
0

संपादकीय अग्रलेख…
कोंबड झाकल म्हणून ,
तांबड फुटायचं थोडचं राहत?
वाचकहो,
सध्याचे युग हे अत्याधुनिक व छानछोकीचे जीवन जगविणारे युग आहे.आपल्याही वाटयाला श्रीमंतीचे क्षण यावेत,अस प्रत्येकाला वाटण स्वाभाविकच आहे.मात्र गेल्या काही वर्षातील साधा अभ्यास जरी केला तरी एवढे मात्र निश्चित म्हणता येईल की,”आमदन्नी अठन्नी खर्चा रुपया”आणि अलिकडच्या काळात आमची जीवन जगण्याची कार्यपद्धती पुर्णपणे बदलून गेल्याने पुढील काळ हा आमच्यासाठी अत्यंत घातक व विनाशकारी असणार आहे.आजच्या कुटूंब पध्दतीत कमावणारा एक आणि मजा करणारे अनेक असे घडत असल्याने त्याचे दुष्परिणाम सुध्दा आम्हांला लवकरच बघावयास मिळतील हि समयसुचकता जर आम्ही वेळीच ओळखली नाही तर मग आमच्या सारखे मुर्ख आम्हीच!असे म्हणण्याची भयानक वेळ येईल हे निश्चितच आहे.आम्ही फुकटचा बडेजाव मिरविण्यासाठी आणि सगळ्या नातेवाईक भाऊबंदामध्ये आम्हीच कसे श्रीमंत हे दाखविण्यासाठी शेखी मिरवितांना नको तेवढे कर्जबाजारी होत जातो आणि मग नको तेवढेच आर्थिक डबघाईस येऊन कर्जाच्या विळख्यात सापडतो.आणि आम्ही हे सगळ का करतोय?याची आत्मपरीक्षण आम्ही कधीच करत नाहीत.समोरच्या व्यक्तीने असे केले म्हणून आम्हीही तसेच करायचे हि वागण्याची पध्दतच मुळात चुकीची आहे,आजकाल आधुनिक युगात बदलाचे वारे स्वाभाविक आहे.मात्र आपणच आपल्या मुलांच्या हाताचे खेळणे किंवा बाहुले व्हावे इतपत तरी मोकळीक मुलांना कधीच देऊ नये.मुलांनी व्यवसाय उद्योग करुन जीवन कसे जगायचे याचे शिक्षण मुलांना जरुर द्यावे.मात्र मुल आपल्याला सांगतील त्या वाटेवरुनच आपण चालावे हे विसंगत कृत्य भविष्यकाळात आपल्याला अंधकारमय रस्त्यावर आणून सोडायला पुरेसे ठरु शकते,याचा विचार गांभिर्याने करताना कुणीच दिसत नाही.आजकाल शेतीचा व्यवसायही तोटयाचा व आतबट्टयाचा होत चालला आहे.हाताला कामधंदे उरललेली नाहीत.लाखो बेरोजगार रस्त्यावर भटकत आहेत.बरेच लोकांची कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटून गेली.भविष्यकाळात आर्थिक आणीबाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.तरी म्हातारीने कितीही कोंबड झाकून ठेवलं आणि चेहऱ्यावर उसन अवसान आणून आर्थिकदृष्ट्या देखावा जरी चांगला असल्याचे भासवले तरी हा फुगा कधी तरी फुटतोच.आणि मग कोंबड झाकल म्हणून तांबड फुटायचं थोडचं राहत.अस म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आजच्या जमान्यात छानछोकीचे जीवन जगून खरे जीवनाचे महत्वच ज्यांना कळाले नाही त्यांना तंतोतंत लागू होते.एवढेच !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here