
⭕ मुंबईतील वानखेडे स्टेडियम आपत्कालीन सेवेसाठी ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होतेय.. वाढत्या रुग्ण संख्येसमोर आता जागा अपुरी पडतेय आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण वाढलाय…
यासाठीच महापौर सौ किशोरी किशोर पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडियमची पहाणी केली सोबत आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले व सहाय्यक आयुक्त ए विभाग चंदा जाधव उपस्थित होते.
वानखेडे स्टेडियमचे रुपांतर महापालिकेच्या आपत्कालीनE कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी आणि कोरोना व्हायरस एसिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह रूग्णांना वेगळे ठेवण्यासाठी एक सेंटर बनवण्याचा बीएमसीचा मानस आहे.