Home Breaking News नांदेड” कोरोनातून १४ रूग्ण बरे, ४७ व्यक्ती बाधित तर तिघांचा मृत्यू –...

नांदेड” कोरोनातून १४ रूग्ण बरे, ४७ व्यक्ती बाधित तर तिघांचा मृत्यू – नांदेड,दि.१२ ; राजेश एन भांगे

168
0

नांदेड” कोरोनातून १४ रूग्ण बरे, ४७ व्यक्ती बाधित तर तिघांचा मृत्यू –
नांदेड,दि.१२ ; राजेश एन भांगे

रविवार 12 जुलै रोजी प्राप्त झालेल्या एकुण 265 अहवालापैकी 198 निगेटिव्ह तर 44 व्यक्ती बाधित आढळले व बाहेर जिल्ह्यातून 3 बाधित नांदेड जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झाले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या एकुण 616 एवढी झाली आहे. यात 44 बाधितांपैकी 16 बाधितांचा अहवाल 11 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले. तसेच उर्वरीत 28 बाधितांचा अहवाल आज 12 जुलै रोजी प्राप्त झाले.
कोरोनाचे जिल्ह्यातील 14 बाधित व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 375 बाधितांना सुट्टी देण्यात आली आहे. शनिवार 11 जुलै रोजी वजिराबाद नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष बाधितांचा व रविवार 12 जुलै रोजी सोमेश कॉलनी येथील 75 वर्षीय पुरुषाचा तसेच परभणी आनंदनगर येथील 34 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या 30 एवढी झाली आहे.

नवीन बाधितांमध्ये उमर कॉलनी देगलूरनाका येथील 55 वर्षाची 1 महिला, दुलेशहानगर (रहेमाननगर) येथील 61 वर्षाची 1 महिला, हमिदियानगर येथील 40 वर्षे वयाची 1 महिला, फरांदेनगर येथील 59 वर्षाचा 1 पुरुष, 50 वर्षे वयाची 1 महिला, 3 वर्षे वयाचा 1 बालक, गोकुळनगर येथील 66 वर्षाचा 1 पुरुष, गंगाचाळ येथील 58 वर्षे वयाचा 1 पुरुष, राजनगर येथील 20 वर्षे वयाची 1 महिला, सिडको येथील 3 वर्षे वयाचा 1 मुलगा, आसर्जन येथील 38 वर्षाचा 1 पुरुष, धनेगाव येथील 9 वर्षाची 1 मुलगी, वाजेगाव येथील 41 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड शहरातील अनुक्रमे 33,55 व 85 वय वर्षाचे 3 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 12 व 32 वर्षाचे 2 पुरुष, कावळगाव येथील 13 वर्षाची 1 महिला, धर्माबाद तालुक्याती शंकर गंज येथील 11 व 40 वर्षाचे 2 पुरुष, 55 वर्षे वयाची 1 महिला, बिलोली गांधी चौक येथील 39 वर्षाचा 1 पुरुष, कुंडलवाडी येथील 46 वर्षाचा 1 पुरुष, नरसी नायगाव येथील 45 व 48 वर्षाचे 2 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला,
नागोबा मंदिर परिसर देगलूर येथील 68 वर्षाची 1 महिला, 64 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर शहरातील 58 वर्षाचा 1 पुरुष, विकासनगर कंधार येथील अनुक्रमे 6,6,32,43,46,55,65 वर्षाच्या 6 महिला, 15 वर्षाचा 1 पुरुष, कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील 55 वर्षाची 1 महिला, मुदखेड तालुक्यातील बाजार महोल्ला येथील 18 व 13 वर्षाच्या 2 महिला, परभणी जिल्ह्यातील जिंतूर कावी 70 वर्षाचा 1 पुरुष, वसमत तालुक्यातील गुंज येथील 33 वर्षाची 1 महिला, लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील 60 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे.

आज रोजी 211 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 25 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 10 महिला बाधित व 15 पुरुष बाधित आहेत. आज रोजी 196 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होती.

आज रोजी 616 बाधितांपैकी 30 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 375 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 211 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 70, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 54, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 27, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 7, जिल्हा रुग्णालय येथे 6, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 17 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 7 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 742,
घेतलेले स्वॅब- 8 हजार 159,
निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 774,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 44 (यात बाहेरुन जिल्ह्यातून आलेले 3) असे एकुण 47,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 616,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 15,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
मृत्यू संख्या- 30,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 375,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 211,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 196 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here