पाच लाखाची लाच घेताना पुणेत पोलिस अधिकारी रंगेहाथ अटक(सिध्दांत चौधरी प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-पुणे २१ जून पिंपरी पोलिस दलात खळबळ तब्बल पाच लाखा ची लाच घेताना सापडला अधिकारी पोलीस फारुख सोलापूरे हा पिंपरी आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत आहे चिखली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक फारुख सोलापुरे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे तब्बल पाच लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले फारुख सोलापुरे अधिकाऱ्यास चिखली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या आणि चौकातील चौकीत नेमणूक दिली होती या प्रकारातील तक्रारदार बांधकाम केलेल्या इमारतीमधील सहा सदनिका विकल्या होत्या त्या सदनिका धारकांकडून काही पैसे येणे बाकी होते हे पैसे मिळावे यासाठी तक्रारदार आणि चिखली पोलीस ठाण्यात 29 मे रोजी अर्ज केला होता या अर्जाची चौकशी करण्याचे काम उपनिरीक्षक फारुख सोलापूरे यांच्याकडे होते गैरअर्जदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी आरोपी सोलापुरे याने तक्रारदार आकडे पाच लाखाची मागणी केली त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानुसार सापळा रचण्यात आला होता फारुख याकूब सय्यद सोलापूरे हे पडताळणीसाठी पाच लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले
Home Breaking News पाच लाखाची लाच घेताना पुणेत पोलिस अधिकारी रंगेहाथ अटक(सिध्दांत चौधरी प्रतिनिधी युवा...