Home Breaking News BMC Launches Air Venti App: करोनाच्या लढ्याला आता डिजीटल बळ; BMCनं सुरू...

BMC Launches Air Venti App: करोनाच्या लढ्याला आता डिजीटल बळ; BMCनं सुरू केलं हे अॅप मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

130
0

🛑 BMC Launches Air Venti App: करोनाच्या लढ्याला आता डिजीटल बळ; BMCनं सुरू केलं हे अॅप🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 19 जून : ⭕ मुंबईसह संपूर्ण राज्यात करोनानं थैमान घातलं आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. करोना रुग्णांचा आकडादेखील वाढत आहे. करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच मुंबई महानगरपालिकेनं करोनाच्या या लढाईत एक अॅप लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेनं एक मोबाइल अॅप्लिकेशन तयार केलं असून या अॅपचं नाव एअर वेन्टी असं आहे.

एअर वेन्टी अॅपच्या मदतीनं मुंबईकरांना कोणत्या भागात किती रुग्ण आहेत. याबाबत माहिती मिळणार आहे. तसंच, प्रकृती खराब असल्यास कोणत्या रुग्णालयात जायला हवं व तिथं किती खाटा रिकाम्या आहेत याबाबतही माहिती मिळणार आहे.

अॅपच्या माध्यमातून मुंबईतील सर्व वॉर्डातील रुग्णालये व कोणत्या रुग्णालयात काय परिस्थीती आहे? रुग्णालयात सध्या किती खाटा उपलब्ध आहेत? ऑक्सिजन सिलेंडरची काय परिस्थिती आहे? याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तसंच, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका व त्यांची उपलब्धता याविषयी सर्व माहिती मिळणार आहे.

संचारबंदी व जनता कर्फ्युच्या काळात या अॅपच्या माध्यमातून मेडिकल मदत मिळणार आहे. या अॅपमध्ये मुंबईतील सर्व २४ वॉर्डातील पालिका रुग्णालय, राज्य सरकार व खासगी रुग्णालयांची माहिती मिळणार आहे. नागरिकांना रुग्णालय शोधण्यात वेळ वाया जात होता मात्र, आता या अॅपमुळं तुमच्या जवळच्या परिसरातील रुग्णालये एका क्लिकवर शोधता येणार आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राहुल शेवाळे यांनी हे अॅप लाँच केलं आहे. भविष्यात एअर वेंटी अॅपमुळं मुंबईतील पावसाचे अपडेटही मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकाच्या आपत्कालीन विभागाच्या डॅशबॉर्डसोबत जोडलं गेलं असल्यानं २४ तास उपलब्ध असणार आहे.

येत्या काळात महानगरपालिकेशी संबंधित माहिती व अन्य माहितीही मिळणार आहे. बीएमसीचं हे अॅप मुंबईकरांच्या सोयीसाठी बनवण्यात आलं आहे. तसंच, नागरिकांचे पावसात प्रचंड हाल होतात. अशावेळी हे अॅप त्यांच्या मदतीसाठी उपयोगी पडणार असल्याचा दावाही केला जात आहे. हे अॅप पूर्णपणे फ्री असून गुगल प्ले स्टोअरवर मोफत डाऊनलोड करता येणार आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here