Home Breaking News राज्यात बऱ्या होणाऱ्यांची संख्या पोहोचली 60,838 वर, पाहा एकूण कोरोना अपडेट ...

राज्यात बऱ्या होणाऱ्यांची संख्या पोहोचली 60,838 वर, पाहा एकूण कोरोना अपडेट मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

120
0

🛑 राज्यात बऱ्या होणाऱ्यांची संख्या पोहोचली 60,838 वर, पाहा एकूण कोरोना अपडेट 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 19 जून : ⭕ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत असताना त्यातच बऱ्या होणाऱ्या रुग्णांनीही 60 हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यात आतापर्यंत 60 हजार 838 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात आज 3 हजार 752 नव्या रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर मागील 24 तासात 100 जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही समोर येत आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 20 हजार 504 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर त्यापैकी 60 हजार 838 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकुण रुग्णांपैकी 53 हजार 901 जणांवर संपुर्ण महाराष्ट्रभरात उपचार सुरू आहेत, तर 5 हजार 751 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाची लागण झालेल्या मात्र इतर आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे.

राज्यात मुंबई शहरात सर्वाधिक म्हणजेच 62 हजार 875 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी 27 हजार 700 जणांवर उपचार सुरू आहेत, तर 31 हजार 856 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजघडीला राज्यात रुग्ण दुपटीचा सरासरी दर 3 टक्के इतका आहे, तर कालावधी 25.9 दिवस इतका आहे.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here