Home युवा मराठा विशेष या तारखेला होणार शाळा सुरू! नियोजन असे आहे

या तारखेला होणार शाळा सुरू! नियोजन असे आहे

218

या तारखेला होणार शाळा सुरू! नियोजन असे आहे 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕राज्यात कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून ऑनलाइन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र त्याला कडाडून विरोध सुरू होत असतानाच आज शालेय शिक्षण विभागाने शाळा जुलै महिन्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जात आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार नववी, दहावी आणि बारावीची प्रत्यक्ष शाळा आणि त्यांचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू केले जाणार आहेत. सहावी ते आठवीचे वर्ग हे ऑगस्टपासून भरवले जाणार आहेत. मुख्य म्हणजे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत त्याच भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांची सुरुवात सप्टेंबर महिन्यापासून होणार आहे. दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रत्यक्ष वर्गाचा निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई मिररने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

शालेय शिक्षण विभागाने आज जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच आवश्यकतेनुसार नवीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने किंवा शाळेत गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन करण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे..⭕

Previous article१५ जूनपासून कडक लँकडाऊन ? महापालिका आयुक्त!…
Next articleराज्यात सलून सुरू करण्यास सरकारची परवानगी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.