🛑 झुंज अखेर अपयशी!🛑
कोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
ठाणे १० जून :⭕ ठाण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मुकुंद केणी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मुकुंद केणी हे ठाण्यातील गरजू लोकांना मदत करत होते. याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली. 27 मे रोजी ही बाब निदर्शनास आली. तेव्हापासून त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
9 जून रोजी रात्री त्यांची तब्येत अचानक खालावली.
त्यामुळे उपचारादरम्यान पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुकुंद केणी यांच्या निधनामुळे कार्यकर्ते, समर्थक आणि कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.⭕