आशाताई बच्छाव
माजी उपसभापती विलास दशमुखे यांच्या हस्ते माना समाजाच्या डान्स हंगामाचे भव्य उद्घाटन!
जिल्हा प्रतिनिधी : सुरज गुंडमवार
दि. 29/12/2025
गडचिरोली :विरांगणा मुग्घायी व नागदिवाळी उत्सवाच्या पावन पर्वानिमित्त माना समाज धुंडेशिवणीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य व रंगतदार डान्स हंगामाचे उद्घाटन *माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे* यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *सुरेश पाटील रंधये* विराजमान होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून खुशाल चुधरी, सुनील कावळे, रविभाऊ चुधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. उद्घाटनप्रसंगी आपल्या भाषणात *.विलास दशमुखे* यांनी समाजातील सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी कला, नृत्य व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा, आत्मविश्वास व सकारात्मक विचारांची भावना वृद्धिंगत होते, असे मार्गदर्शन त्यांनी केले. तथा आयोजकांचे कौतुक करताना सांगितले की, अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजातील नव्या पिढीला आपल्या परंपरा, संस्कृती व ओळखीची जाणीव होते आणि सामाजिक एकात्मता अधिक मजबूत होते.
डान्स हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी परिसरातील नागरिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. रंगतदार नृत्य सादरीकरणे, उत्साही वातावरण आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.
दिवसभर चाललेल्या या समारंभात सकाळी गावातून फेरी काढून सभास्थळी आणण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या निधीतून माना समाजाला देण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.






