आशाताई बच्छाव
बदनापूर येथील अल्पवयीन मुलींना पोलिसांनी सुखरूप घरी परत आणल्याने नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन मानले आभार
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
बदनापूर जालना:- तब्बल नऊ दिवसापासून हरवलेल्या बदनापूर येथील १४ वर्षाची आणि मांजरगाव येथील १५ वर्षाची अशा दोन मुलींचा शोध लावून त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात सुपूर्त करण्याची उल्लेखनीय कामगिरी बदनापूर पोलिसांनी केली आहे.
१ डिसेंबर रोजी दोन्ही मुली घरच्यांना न सांगता बाहेर पडल्या सकाळी शाळेत जात असताना घरी सांगितले की आज शाळेत कार्यक्रम आहे घरी येण्यासाठी उशीर होईल असे सांगून शाळेत गेल्या होत्या नंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोघेही घरी परतल्या नसल्याने घरातील लोकांना त्यांचा शोधा शोध घेतला असता त्या दोघीही मिळून आल्या नाहीत.त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता त्या मिळून न आल्याने पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये त्या हरवल्या बाबतची तक्रार दाखल केली होती.
प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक एम.टी.सुरवसे यांनी तात्काळ लहान मुलींना पळवून नेल्याचा गुन्हा नोंदवून तीन स्वतंत्र पथकामार्फत व्यापक शोध मोहीम राबवली एक पथक बिहार – उत्तर प्रदेश – नेपाळ दुसरे मुंबई आणि तिसरे स्थानिक परिसरात असे विभाजन करण्यात आले. दरम्यानच्या काळात आपला घरातील लोकांना शोध घेता येऊ नये यासाठी मुलींनी आपल्याकडे असलेले मोबाईल व सिम कार्ड बंद केले होते. परंतु येथे भेटले तेथे इंटरनेटचा उपयोग करून त्या व्हाट्सअप चालू करत होत्या सदर मुली या बदनापूर हून जालना मुंबई जैननगर बिहार जनकपुर नेपाळ असा अंदाजे २००० किलोमीटर प्रवास करून नेपाळमध्ये दोन दिवस मुक्काम करून जनकपुर परिसर जानकी मंदिर इत्यादी परिसराला भेट देऊन फिरत असताना जनकपुर नेपाळ येथील रेल्वे स्टेशन वरील त्यांनी इंटरनेट वापरण्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाल्याने माननीय आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक साहेब जालना यांनी बिहार तसेच नेपाळ येथील पोलिसांची संपर्क साधून मुली बाबतची माहिती घेऊन त्या ठिकाणी एक पथक तात्काळ रवाना केले दरम्यान सदर मुलींनी नेपाळ सोडून पुन्हा रेल्वेने मुंबईला येत असताना आदित्य झा नावाच्या प्रवाशीची त्यांची ओळख झाली होती. तेव्हा रेल्वे प्रवासात त्यांनी आदित्य झा यास विनंती केली की त्यांना मुंबईमध्ये भाड्याने रूम पाहिजे आहे तेव्हा त्याने त्यांना रूम करून देतो असे सांगितले होते. त्याचवेळी त्यांचे इंटरनेट सुद्धा मुलींनी वापरले होते. त्यादरम्यान तांत्रिक तपास करून मुली हया पवन एक्सप्रेस रेल्वेने जैननगर येथून ठाणे येथे येत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे ठाणे कळवा येथे दुसरी पोलीस टीम रवाना केली असता मुंबई कळवा येथे दोन्ही मध्ये सुकरूप मिळून आल्या त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे. आज रोजी मुले आपल्या घरी सुखरूप आल्या याबाबत मुलींचे नातेवाईक यांना विश्वास बसत नव्हता पोलीस स्टेशन बदनापूर येथे येऊन पेढे वाटप केले व पोलिसांचे आभार मानले. तसेच या मुलींच्या शोध मोहिमेमध्ये मा. श्री अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक साहेब जालना व माननीय श्री आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक साहेब जालना यांचा सुद्धा मोलाचा वाटा असल्याने त्यांचे सतीश आरसूळ, बद्रीनाथ आरसुळ ,सिद्धेश शेळके,डॉ.रामेश्वर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.






