Home नागपूर नागपूर | अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये शेळीपालनावर अभयसिंह मारोडे यांचे मार्गदर्शन; तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद 

नागपूर | अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये शेळीपालनावर अभयसिंह मारोडे यांचे मार्गदर्शन; तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद 

89

आशाताई बच्छाव

1002234986.jpg

नागपूर | अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये शेळीपालनावर अभयसिंह मारोडे यांचे मार्गदर्शन; तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
✍🏻 स्वप्निल देशमुख
मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅग्रो व्हिजन – नागपूर येथे रविवारी झालेल्या शेळीपालनविषयक सत्राला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. “Goat Farming – Export Opportunities” या विषयावर अभयसिंह मारोडे यांचे हॉल क्रमांक 2 मध्ये दुपारी 12 ते 1 या वेळेत व्याख्यान झाले.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत हॉलमध्ये प्रचंड गर्दी राहिली. शेळीपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन, निर्यात क्षमता आणि बाजारपेठेतील वाढत्या मागणीविषयी मारोडे यांनी सरळ, सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. उपस्थितांनी सातत्याने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी संयतपणे उत्तरे देत व्यवसायातील योग्य दिशा स्पष्ट केली.

व्याख्यानानंतर अनेक तरुण–तरुणींनी त्यांच्या भोवती गर्दी करत व्यक्तिगत मार्गदर्शन घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. “हीच पिढी उद्या भारतीय शेतीला आणि शेळीपालन व्यवसायाला नवी उभारी देईल,” अशी भावना मारोडे यांनी यावेळी व्यक्त केली.

या सत्रात राजस्थानहून विशेष आलेले आदरणीय पटेल सर हे दुसरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
अ‍ॅग्रो व्हिजनने दिलेल्या व्यासपीठाबद्दल आणि संधीबद्दल आयोजकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Previous articleशाहिरी लोक कला मंचा तर्फे नवीन कार्यकारणी मध्ये स्वारीता पाटकर यांची नियुक्ती.
Next articleरामायणाप्रमाणे भारताचे संविधान सुध्दा टि.व्ही.वर दाखवायला पाहिजे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.