आशाताई बच्छाव
अनेकतेत एकतेचा अनुपम नजारा निरंकारी सामूहिक विवाह सोहळा
महाराष्ट्रासह देश0विदेशातील 126 जोडपी विवाहबद्ध
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ:- 78 व्या निरंकारी संत समागमाच्या समारोपानंतर समालखा मधील त्याच भव्य मैदानावर सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन उपस्थितीत निरंकारी सामूहिक विवाह सोहळा आपल्या साधेपणाची परंपरा जपत यावर्षीही आयोजित करण्यात आला. या प्रसंगी नवविवाहित जोडपे परिणयसूत्रात बांधले गेले आणि त्यांनी आपल्या नवजीवनाच्या मंगल प्रारंभासाठी सतगुरुंचे शुभ आशीर्वाद देखील प्राप्त केले. हा सोहळा अत्यंत अनुपम आणि प्रेरणादायी ठरला, ज्यामध्ये भारतातील विविध राज्यांमधून बिहार, चंदीगड, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांसह परदेशातील ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथून आलेल्या 126 नवजोडप्यांनी सहभाग नोंदविला. या पवित्र प्रसंगी सर्व 126 वर-वधू एकाच स्थानावरून एकात्मता आणि साधेपणाचा सुंदर संदेश देत परिणयसूत्रात बांधले गेले. या वेळी मिशनचे वरिष्ठ अधिकारी, वर-वधूंचे कुटुंबीय आणि श्रद्धाळू भक्तगणांनी या दिव्य आणि भावनिक दृश्याचा भरभरून आनंद प्राप्त केला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक जयमाला आणि निरंकारी परंपरेतील सामाईक पुष्पहार या विधीने झाली. त्यानंतर भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात निरंकारी लावांचे हिंदी भाषेत गायन करण्यात आले, ज्यातील प्रत्येक ओळ नवविवाहितांसाठी आध्यात्मिक संदेश आणि गृहस्थ जीवनाच्या कल्याणकारी शिकवणींनी परिपूर्ण होती. सोहळ्यादरम्यान सतगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजींनी नवविवाहित जोडप्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना सुखमय, आनंदमय आणि समर्पणमय जीवनाचे आशीर्वाद दिले.






