आशाताई बच्छाव
गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का! शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:
गडचिरोली शहरातील काँग्रेस पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते व जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव श्री. घनश्याम वाढई (रा. गोकुलनगर, वार्ड क्र. २३) तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सागर अरुण निंबोरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे भाजपचे विदर्भ संघटक मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
✴️ सागर निंबोरकर यांचा काँग्रेसला धक्का
काँग्रेसचा मजबूत आधारस्तंभ मानले जाणारे सागर अरुण निंबोरकर यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरातील काँग्रेस संघटना कमकुवत होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आंबोरकर दांपत्यही भाजपात
यावेळी श्री. प्रफुलराव आंबोरकर (माजी उपाध्यक्ष, युवा काँग्रेस) आणि सौ. ज्योती आंबोरकर (महिला काँग्रेस कार्यकर्त्या) यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला.
“विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी भाजपात प्रवेश” — घनश्याम वाढई
पक्षप्रवेशानंतर घनश्याम वाढई यांनी सांगितले,
> “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होत आहे. आम्हीही या विकासयात्रेचा भाग बनण्यासाठी भाजपात प्रवेश केला आहे.”
भाजपात नवचैतन्य
या नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे गडचिरोली जिल्ह्यात भाजपाचा विस्तार आणि जनाधार अधिक वाढणार असल्याचा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, सहकार महर्षी प्रकाश सा.पोरेड्डीवार,माजी खा.अशोक नेते माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे,जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गिताताई हिंगे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, समन्वयक प्रमोद पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीभैया कुकरेजा, शहराध्यक्ष अनिल कुंघाडकर, जेष्ठ नेते सुधाकरजी येंगदलवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.






