आशाताई बच्छाव
संघर्षाशिवाय न्याय नाही, अखेर सत्याचा विजय झाला! आजच्या उपोषण आंदोलनात शेवटी न्याय झालाच : राजेंद्र पाटील राऊत मालेगाव प्रतिनिधी प्रविण क्षीरसागर:- जगाच्या इतिहासाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कुठलाही न्याय हा सहजासहजी मिळणे शक्यच नसून, त्यासाठी संघर्ष हेच एक लोकशाहीतील सगळ्यात मोठे शस्त्र असल्याचे प्रतिपादन युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी केले आज सोमवार दिनांक ६ आँक्टोबर रोजी मालेगाव पंचायत समिती समोर सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला शेवटी मोठे यश प्राप्त झाले असून,जागा प्रश्र्नी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत केलेल्या ठरावाची प्रोसिडींग नक्कल उपोषणकर्तै राजेंद्र पाटील राऊत यांच्या स्वाधीन करीत हे उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विश्वास सावंत,विस्तारधिकारी गुलाब राजबन्शी, महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक तथा लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारत पवार ओझर, ग्रामपंचायत अधिकारी संजीव घोंगडे, कँम्प पोलिस स्टेशनचे रुपचंद पारधी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.राजेंद्र पाटील राऊत यांनी व-हाणे येथील जागा मागणी प्रश्नावर केलेल्या सततच्या पाच वर्षातील संघर्षाला नुकतेच यश प्राप्त झाल्याने,ते त्याविषयी आपली भुमिका मांडताना बोलत होते. माझी संघर्षात्मक वाटचाल तुमच्या साथीने व आशिर्वादाने व्यशस्वी…!जिंकलोत आपण भावांनो!! व-हाणे जागा मागणी प्रकरणाची पाच वर्षांची संघर्षगाथा
१) जागा मागणी प्रकरणाची सुरुवात १७/७/२०२० रोजी सुरुवात
२) जागा मागणीला विरोध म्हणून संघर्षाला सुरुवात
३) संघर्ष काळात एकूण १०.००० हजार तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले
४) तर २००० हजार माहिती अधिकार अर्ज दाखल करून सगळे गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले
५) एकूण १० उपोषण आंदोलन करण्यात आले.(प्रत्येकी ३ ते ६ दिवसांपर्यंत)
६) एक आत्मदहन आंदोलन करण्यात आले सन २०२२ मध्ये
७) एकूण तीन गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, जितेंद्र देवरे,भरत वेंदे,अजित पवार,आणि सध्या कार्यरत चंद्रकांत साबळे
८) ग्रामपंचायत दप्तरांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत एकूण १० वेळा चौकशी
९)एक वेळा नांदगाव पंचायत समितीची चौकशी समिती नेमून दप्तर तपासणी. १०) ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेच्या एकूण दोन वेळा विभागीय आयुक्तांकडे चौकश्या व अद्यापही केस सुरू ११) संघर्ष लढा थांबवत नाही म्हणून ३० आँक्टोबर २०२३ रोजी पंचायत समिती परिसरात प्राणघातक हल्ला,पोलिसांत गुन्हा दाखल १२) तरीही संघर्ष सुरुच व लढा कायम १३) सरपंच अपात्र प्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेत सुनावणी १४) सरपंचाचा राजीनामा, मात्र मंजूर नाही १५) सरकारी जागांवर घरे बांधत असल्याच्या गैरव्यवहारांची पुन्हा तक्रार व त्यावर दिनांक १२ आँगस्ट २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यां समोर सुनावणी १६) दिनांक १९ आँगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत पदाधिकारीच्या उपस्थितीत मागणी केलेली आणि ताब्यात व वापरात असलेली जागा मोजणी व आखणी करून ताब्यात दिली १७) दिनांक २५आँगस्ट २०२५ सरपंच राजीनामा मंजूरीनंतर नवीन सरपंचाची निवड १८) दिनांक २८ आँगस्ट २०२५ ग्रामसभा घेऊन जागा देण्याच्या दृष्टीने कागदोपत्री हालचाल सुरू १९) जागा मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षाचा एकूण दिवसांचा कालावधी एक हजार नऊशे आठ १,९००,८,दिवस एवढा लागला २०) सोमवार दिनांक ६ आँक्टोबर २०२५ रोजी जागेबाबत ग्रामसभा ठराव व प्रोसेडिंग नक्कल उपोषण आंदोलनात देऊन जागा अधिकृतपणे दिली.या संघर्षाच्या काळात आपल्या सोबत अगदी खंबीरपणे धाडसाने उभे राहिलेले आपुलकीचे आपले माणसं श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक व-हाणे, युवा मराठा वृत्तपत्रांचे संपादक राजेंद्र तुकाराम पवार व-हाणे, पत्रकार जगदिश बधान अजमीर सौंदाणे,दावल पगारे धांद्री, भाऊसाहेब भामरे ब्राम्हणगाव,,नयन शिवदे ठेंगोडा, बाळासाहेब निकम कळवण, प्रविण पवार, ताहराबाद,निलेश भोये, गोपीनाथ भोये,भिमखेत, किशोर अंकुशे, सुभाष अंकुशे,विजय सोमपूर, चांदणे मालेगाव, मनोहर देवरे, शांताराम देवरे, सटाणा, सुनील गांगुर्डे चांदवड ,सुरेश वाटपाडे निफाड,भारत पवार महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक तथा लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओझर,काकाजी साळुंखे, प्रविण क्षीरसागर, प्रमोद पवार, आंशूराज पाटील,दिपक भावसार, प्रदीप मोरे, शेखर पगार, साहेबराव वाघ,प्रदीप पहाडे,कै.सुभाष कचवे, मालेगाव, अनिल धामणे नांदगाव, डॉ.एम.सी.पानपाटील, अँड विनया नागरे नाशिक, विजय पाटील चाळीसगाव, नरेंद्र पाटील जळगाव,हारूण शेख, तौफिक अतार, इम्तियाज अतार, सुदर्शन बर्वे, मुकुंद चिते नाशिक, अँड पंकज गायकवाड नाशिक, विजय पवार मुंबई,अँड प्रसाद संकपाळ मुंबई, विलास पवार पुणे, सुर्यकांत भोर, उमेश पाटील पुणे, मनोज बिरादार नांदेड, गजानन शिंदे देगलूर, बस्वराज वंटगिरे मुक्रामाबाद, स्वप्नील देशमुख बुलढाणा, ज्ञानेश्वर दांदळे पाटील बुलढाणा,-संजय पन्हाळकर बुलढाणा, सतिश लाहुळकर अकोला,सुरज गुंडमवार गडचिरोली, दिलीप बोंडे जालना, गोपाल तिवारी वाशिम, रामभाऊ आवारे निफाड, कुरेशी मंडप अँन्ड डेकोरेर्टस मालेगाव कॅम्प, मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे समस्त अधिकारी कर्मचारी, पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मालेगाव पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांचीही आम्हाला बहुमोल साथ व मार्गदर्शन लाभले. आम्ही आपले ऋणी आहोत. राजेंद्र पाटील राऊत