Home नाशिक व-हाणे ग्रामपंचायतीच्या आडमुठेपणाच्या निषेधार्थ सोमवार पासून पंचायत समिती समोर युवा मराठा महासंघाचे...

व-हाणे ग्रामपंचायतीच्या आडमुठेपणाच्या निषेधार्थ सोमवार पासून पंचायत समिती समोर युवा मराठा महासंघाचे आमरण उपोषण आंदोलन

208

Yuva maratha news

1002031922.jpg

व-हाणे ग्रामपंचायतीच्या आडमुठेपणाच्या निषेधार्थ सोमवार पासून पंचायत समिती समोर युवा मराठा महासंघाचे आमरण उपोषण आंदोलन
मालेगाव प्रतिनिधी : व-हाणे,ता.मालेगाव येथील ग्रामपंचायतीच्या आडमुठेपणा च्या धोरणामुळे युवा मराठा महासंघाने मालेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवार ६ आँक्टोबर पासून आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
महासंघाने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,व-हाणे गावच्या रहिवाशी असलेल्या निराधार विधवा महिला श्रीमती अलका शांतीलाल बच्छाव यांना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व गावातील जाणकार नागरिकांनी मंजूर असलेले घरकुल बांधकामासाठी जागा मोजणी व आखणी करून दिली , वास्तविक हि शासकीय गावठाण जागा अलका बच्छाव यांच्या ताब्यात व वापरात सुमारे पाच वर्षांपासून आहे.त्याबाबत सन २०२० मध्ये मासिक मिटींगचा ठराव करून सदरची जागा अलका बच्छाव यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे.असे असताना आँगस्ट २०२५ महिन्यात पुन्हा अलका बच्छाव यांच्या कडून जागा मागणी अर्ज घेण्यात येऊन ग्रामपंचायत दप्तरी दाखल करून घेतल्यावर सुध्दा आजपर्यंत अलका बच्छाव यांना ग्रामपंचायतीने अर्जानुसार झालेल्या ग्रामसभेचा ठराव आणि प्रोसेडिंग नक्कल दिलेली नाही.ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी संजीव घोंगडे व कर्मचारी हेतूपुरस्सर अडवणूक करून निराधार महिलेस वेठीस धरत असल्याने भविष्यात होणाऱ्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी ग्रामपंचायत व-हाणे व ग्रामपंचायत अधिकारी घोंगडे तसेच कर्मचाऱ्यांची राहिल असेही निवेदनातून नमूद करण्यात आले आहे.
तर ग्रामपंचायत अधिकारी घोंगडे व कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणाच्या निषेधार्थ हे उपोषण आंदोलन छेडले जाणार असल्याचे शेवटी महासंघाने निवेदनातून नमूद केले आहे.

Previous articleजि.प.,पं.स., महानगरपालिका निवडणूका जाहीर , इच्छूक उमेदवारांत उत्साहाचे वातावरण
Next articleसौ रुपाली कोठुळे यांना मनु मानसी संस्थेचा नवदुर्गा पुरस्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.