आशाताई बच्छाव
रोझे गावातील अतिवृष्टी ग्रस्तांना भरीव मदत देण्याच्या मागणीसोबतच विकासकामांसाठी आ.कांदे यांना निवेदनाव्दारे साकडे
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव: रोझे ता.मालेगाव येथील अतिवृष्टीत पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची भरीव मदत मिळावी या मागणी सोबतच रोझे गावातल्या विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे साकडे आज एका निवेदनाद्वारे रोझे ग्रामस्थांनी आ.कांदे यांच्याकडे घातले आहे.
याबाबत सविस्तर असे की, परतीच्या पावसाने रोझे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातून हिरावला गेला आहे.म्हणून शेतकऱ्यांना तातडीची भरीव मदत करण्याबरोबरच रोझे गावातील विविध विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रोझे येथील सरपंच सौ.सुमनताई अभिमन्यू गायकवाड, नामदेव उगले, सोमनाथ उगले, राजाराम घुगे,अभिमन्यू काळू गायकवाड आदींनी आमदार सुहास कांदे व ज्ञानेश्वर कांदे यांची भेट घेऊन प्रत्यक्षदर्शी निवेदन देऊन सदर मागणी केली आहे.