आशाताई बच्छाव
गडचिरोली येथे भाजपाचा सेवा पंधरवडा कार्यक्रम संपन्न
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी याची विशेष उपस्थिती
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ – गडचिरोली शहरात भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवाडा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना सेवा पंधरवाडा सप्ताहात आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, गावातील स्वच्छता, नागरिकांच्या भेटी घेऊन केंद्र तथा राज्य सरकारचे जनलोक उपयोगी कार्य लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करावी. तसेच भाजप कार्यकर्त्यांना आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपा पक्षाची काय राजकीय दिशा राहील यासंदर्भात सविस्तर चर्चा व मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी येणाऱ्या स्थानीय स्वराज संस्थेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरून गडचिरोली नगर परिषद वर झेंडा फडकणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. त्यासाठीच आतापासूनच सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन या वेळी केले. यावेळी भाजपा गडचिरोली तालुका अध्यक्ष दत्तू सूत्रपवार, शहर अध्यक्ष अनिल कुणघाडकर, शहर महामंत्री विनोद देवोजवर, रमेश नैताम, मोरेश्वर भांडेकर, शहर महामंत्री हर्षल गेडाम, सोशल मीडिया संजोजक सुरज गुडमवार, स्वप्नील पंडिलवार आदि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.