आशाताई बच्छाव
“जुनी पिढी, जिव्हाळ्याची शिदोरी आणि शिकवण”
आजच्या धावपळीच्या युगात आपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकून बसलो आहोत, पण खऱ्या आयुष्याचं शहाणपण, अनुभव आणि माणुसकीची खरी शिदोरी अजूनही या जुन्या पिढीकडे आहे.
या छायाचित्रात माझ्यासोबत बसलेली मंडळी म्हणजे खऱ्या अर्थाने गावाची उभी भिंत. चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत, पण त्या सुरकुत्यांमध्ये एकेक अनुभवाचं पर्व दडलं आहे. हातांना घट्ट शिरा दिसतात, पण त्या शिरांमध्ये आयुष्यभराच्या कष्टाची कहाणी आहे. बोलणं साधं, हसणं निरागस, पण जगण्याची तत्त्वं मात्र अढळ.
आज आपण प्रगतीच्या नावाखाली बरीच तंत्रज्ञानाची साधनं मिळवलीत, पण तरीही माणुसकी, आपुलकी, आदर यांची कमी जाणवते. ही मंडळी आपल्याला शिकवतात—
👉 आयुष्य मोठं नसावं, आयुष्य जगण्यासारखं असावं.
👉 पैसा कमावण्यापेक्षा माणसं जपणं महत्त्वाचं.
👉 प्रेम, आपुलकी, आदर आणि जिव्हाळा हेच खरी संपत्ती आहे.
मी, आज या ज्येष्ठांच्या सहवासात बसलो आणि जाणवलं— “ही पिढी पुन्हा जन्माला येणार नाही.”
त्यांचं आयुष्य म्हणजे एक जिवंत विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची पदवी घेतली, तर कुठलंही आयुष्य आनंदात आणि समाधानात जगता येईल.
आजचा हा क्षण मला एक मोठा धडा देऊन गेला—
“जुनं म्हणजे ओझं नाही… जुनं म्हणजे शिकवण आहे, आधार आहे आणि आपुलकीची शिदोरी आहे.”
––स्वप्निल बाप्पू देशमुख
मो 9552381088