आशाताई बच्छाव
प्रेयसीला भोसकले मग युवकाने स्वतःच्या छातीत खुपसला चाकू
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
खामगावच्या हॉटेलमध्ये थरार
बुलढाणा:- खामगाव दोन वर्षांपासून प्रेम संबंध असलेल्या साखरखेर्डा येथील युवक आणि युवतीच्या आयुष्याचा अंत आज खामगावात झाला. प्रियकर साहिल उर्फ सोनू राजपूतने आधी आपली प्रेयसी ऋतुजा पद्माकर खरात हिला भोसकले नंतर स्वतःच्या छातीत चाकू खुपसून घेत आत्महत्या केली. खामगाव मधील सजनपुरी भागात जुगनू हॉटेलमध्ये रात्री 08:30 वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्लिम असल्याची अफवा सुरुवातीला संपूर्ण खामगाव मध्ये पसरले होते त्यामुळे जवळपास अडीच ते तीन हजार लोकांची गर्दी घटनास्थळी पोहोचली होती. परंतु दोघेही हिंदू असल्याचे सत्य समोर आल्यानंतर खामगाव हे “अफवांचे शहर” असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऋतुजा आणि सोनू राजपूत यांच्यामध्ये मागील दोन वर्षांपासून प्रेम संबंध आहे यादरम्यान ते अनेकदा खामगांवमध्ये भेटले. ऋतुजा खरात खामगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. मागील वर्षी दहाव्या वर्गामध्ये प्रथम आल्यामुळे तिचा मोठा सत्कारही झाला होता. नंतर ती खामगावला शिकायला गेली. सोनू राजपूत आणि ऋतुजाचे शेत लागून आहे. सोनू आज खामगाव मध्ये ऋतुजाला भेटायला आला होता. हॉटेल मालकाकडे सोनुनेचे आधार कार्ड दिले त्यावर मात्र पायल पवार असे नाव होते. त्यामुळे अनेकांच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सोनू राजपूत आणि पायल पवार अशी नावे आलेली आहेत परंतु ज्या आपल्या प्रेयसीची हत्या सोनवणे केली तिचे नाव ऋतुजा खरात आहे. पोलीस घटनास्थळावर असून मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.
जारूमध्ये दोघेजण थांबले होते त्या ठिकाणी रक्ताचा सडा पडलेला आहे. सोनूच्या छातीवरची जखम स्पष्टपणे दिसत आहे.