Home नांदेड पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा जंगी सत्कार

पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा जंगी सत्कार

133

आशाताई बच्छाव

1001989596.jpg

पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा जंगी सत्कार

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

पत्रकार संरक्षण समितीच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील कर्तृत्ववान अधिकाऱ्यांचा जंगी सत्कार व गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक नीलम कांबळे व पोलीस निरीक्षक मारोती मुंडे या तिघा मान्यवरांचा शाल, हार व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांचा 100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा मोहिमेत देगलूर उपविभागीय कार्यालयाला संभाजीनगर विभागातून प्रथम क्रमांक मिळवून दिल्याबद्दल व पूरस्थितीत जीवाची पर्वा न करता केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
नगरपरिषद मुख्याधिकारी नीलम कांबळे यांचा 100 दिवसीय सुधारणा मोहिमेत देगलूर नगरपरिषदेला तृतीय क्रमांक मिळवून दिल्याबद्दल तसेच शहरातील उपक्रमांतून केलेल्या प्रशंसनीय कार्यासाठी सन्मान करण्यात आला.
तर पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांचा शहरात रुजू झाल्यापासून उत्कृष्ट पोलीस प्रशासन दिल्याबद्दल, पूरस्थितीत केलेल्या धाडसी कार्याबद्दल आणि ‘उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार’ मिळवल्याबद्दल जंगी सत्कार करण्यात आला.
आपले मनोगत व्यक्त करताना उपविभागीय अधिकारी अनुप पाटील म्हणाले की, “पत्रकार संरक्षण समितीने अल्पावधीत झपाट्याने कार्य केले आहे. पत्रकारांचे सहकार्य असेच लाभत राहिले, तर देगलूरच्या विकासात निश्चितच गती येईल. मी पत्रकार संरक्षण समितीचे आभार मानतो.”
यावेळी विशेषत्वाने उपविभागीय अधिकारी अनुप पाटील व पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनीही पूरस्थितीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करून त्यांना गौरविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभु वंकलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन टेकाळे यांनी मानले.
या प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम, स्वच्छता निरीक्षक गौरव कुमार जाधव, कुणाल उनग्रतवार, दत्तु मारावार, व्यापारी सचिन ढगे, पोलीस कॉन्स्टेबल मुदिराज, स्वच्छता जागर ग्रुपचे सुर्यकांत सुवर्णकार, तसेच उपाध्यक्ष अमित पाटील, सचिव गजानन टेकाळे, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, कोषाध्यक्ष तोहिद काझी, सहसचिव मनोज बिरादार, सहकार्याध्यक्ष धनाजी जोशी, संघटक श्वेता चिदमलवाड, सदस्य रियाज अत्तार, प्रसेनजीत दावणगीरकर, संजय शाखावार, आफान शेख आदी उपस्थित होते.