आशाताई बच्छाव
नालीत गेली कार ! – ड्रेनेज कंत्राटदाराचा निष्काजीपणा!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा ड्रेनेजसाठी खोदलेल्या नालीत कार पलटी होऊन अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खामगाव शहरात ड्रेनेज कंत्राटदाराचा निष्काजीपणा सुरु असून एका अपघातामुळे कारवाईची मागणी जोर धरत आहे.बुलढाण्याच्या खामगाव शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे, त्यासाठी रस्त्याच्या बाजूने सात ते आठ फूट खोल नाल्या खोदून ठेवल्या आहेत.. मात्र संबंधित कंत्राटदाराने काम करत असताना कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे दररोज अपघात घडत असून यात वृद्ध व लहान मुलं जखमी होताना दिसत आहेत. रात्री खामगाव शहरातील बोबडे कॉलनी परिसरात डॉ. ब्रह्मानंद टाले हे त्यांच्या कार ने जात असताना ड्रेनेजसाठी खोदून ठेवलेल्या नालीत त्यांची कार पलटी होऊन अपघात झाला, यात डॉ. ब्रह्मानंद टाले हे गंभीर जखमी झालेत, संबंधित कंत्राटदार कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन करत नसल्याने या कंत्राटदारावर कारवाईची मागणी खामगाव शहरातील नागरिक करत आहे.