आशाताई बच्छाव
प्रकोप ! वरूणराजाचा रुद्रावतार ! -222 गावे बाधीत ! – दोघांचा मृत्यू, घरे पडली, 58499 हेक्टरवरील पिके उध्वस्त !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा सलग दोन दिवसांपासून जोरदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून यंत्रणेच्या प्राथमिक अहवालानुसार 222 बाधीत गावातील 58499.74 हेक्टरवरील
पिके उध्वस्त झाली आहे.
शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. देऊळगाव राजा तालुक्यात व मलकापूर येथे घरांच्या भिंती खचल्या, घरांची पडझड झाली. पशुधन वाहून गेले तर शेतातील विहिरी खचल्या आहे. तसेच मेहकर तालुक्यात 15 सप्टेंबर रोजी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मेहकर तालुक्यातील वडाळी येथील विठ्ठल पांडूरंग जटाके (51) यांचा शेतात शॉक लागून तर गोमधेर येथील रामदास सखाराम खडक (70) यांचा शेततळ्यात पडून करुण अंत झाला. विशेष म्हणजे देऊळगाव राजा, मलकापूर, जांभूळधाबा, नरवेल, धरणगाव महसूल मंडळात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.कुठे किती नुकसान?
मलकापूर तालुक्यात सर्वाधिक 78 गावात नुकसान झाले तर त्या पाठोपाठ देऊळगाव राजा
तालुक्यात 64 गावे बाधित झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात 54 गावे, नांदुरा तालुक्यात 17 गावे, बुलढाणा तालुक्यात पाच गावे तर शेगाव मध्ये चार गावे बाधित झाली असल्याचा प्रशासकीय यंत्रणेचा अहवाल ‘युवा मराठा ‘ ला प्राप्त झाला आहे.वज्रघाताने घर क्षतिग्रस्त, 3 लाखांचे नुकसान ! विजांनी तांडव केला असून बुलढाणा शहरात विज कोसळून घरांची व विद्युत उपकरणांची हानी झाल्याची घटना सकाळी 9 वाजता येथील क्रीडा संकुल परिसरात समोर आली. भूषण यंदे यांच्या घरावर विज पडल्याने अनेकांच्या उरात धडकी भरली. या घटनेत सुदैवाने जिवित हानी टळली आहे. परंतू या घटनेत भूषण यंदे यांचे 3 लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी राजपूत यांनी केला आहे.