आशाताई बच्छाव
भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी साईनाथ तेलंगे
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २४/०९/२०२५
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील साईनाथ तेलंगे पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी छत्रपती संभाजी नगर येथे प्रदेश कार्यकारणीचे सदस्य संदीप शिंदे छत्रपती संभाजीनगरचे महानगर अध्यक्ष श्याम देशमुख यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे. साईनाथ तेलंगे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून अनेक सामाजिक कार्य त्यांच्या हातून झाले असल्याचे बोलले जाते याचीच दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साईनाथ तेलंगे पाटील यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली यावेळी त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संदीप शिंदे छत्रपती संभाजीनगरचे महानगर अध्यक्ष श्याम देशमुख हे यावेळी हजर होते. आपण भविष्यातही संघटनेच्या माध्यमातून भरीव कार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी साईनाथ तेलंग यांनी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा यांना दिली.






