आशाताई बच्छाव
मृतक प्रकाश कावळे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावे
MIM पक्षातर्फे पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेबांना निवेदन देण्यात आले
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ –शहरातील पोटेगाव रोड वर गोंडवाना कला दालन समोर रामनगर येथील रहिवासी मृतक प्रकाश कावळे यांचं 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास लॉयड अँड मेटल्स कंपनी लिहून असलेली मिनी ट्रॅव्हल्स ने दुर्दैवी अपघात झालं
अपघात एवढं गंभीर होतं की दोन्ही साइड चे पासऱ्या मोडले
दुसऱ्या दिवशी प्रकाश कावळे यांचं दुर्दैवी निधन झालं
प्रकाश कावळे गरीब घरचा कर्ता व्यक्ती निघून गेल्यामुळे कुटुंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे
प्रकाश कावळे यांचं कुटुंबीय छोट्याशा घरात राहून आनंदाने जीवन जगत होते पण काळाने कर्ता व्यक्ती घेऊन गेल्यामुळे
प्रकाश कावळे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ट्रेंड मॉल मध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक करून सदर मिनी ट्रॅव्हल्स वर लॉयड अँड मेटल्स कंपनीचे लेबल लावले होते याची सखोल चौकशी करून प्रकाश कावळे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे आणि न्याय मिळवून द्यावे अशी मागणी MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष विपिन सूर्यवंशी, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, गोरक्षक दलाचे जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा अध्यक्ष तौफिक सय्यद, युवा आघाडी शहर अध्यक्ष मुन्ना रामटेके, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुस्ताक सय्यद, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष करणं मोहुर्ले, रेहान शेख,
MIM महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, महिला कार्याध्यक्षा शगुप्ता शेख, महिला जिल्हा उपाध्यक्ष जयाताई कोंडे, उज्वला क्षिरसाठ, किरण सहारे, आदि उपस्थित होते