Home बुलढाणा EXCLUSIVE राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मेळाव्यात खुर्च्य रिकाम्या ! – स्थानिक पदाधिकाऱ्यांचा...

EXCLUSIVE राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मेळाव्यात खुर्च्य रिकाम्या ! – स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पावरच नाही ! – जनतेसाठी काम करण्याची अॅलर्जी! –

157

आशाताई बच्छाव

1001940368.jpg

EXCLUSIVE राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मेळाव्यात खुर्च्य रिकाम्या ! – स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पावरच नाही ! – जनतेसाठी काम करण्याची अॅलर्जी! –
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तथा मार्गदर्शनासाठी आता कुठे राष्ट्रवादीला (शरदचंद्र पवार गट) कार्यकर्ता मेळावा घेण्याची जाग आली आहे. आज बुलढाण्यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी येथील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा घेतला. परंतु या मेळाव्याला ना शिस्त होती ना गर्दी! त्यामुळे स्थानिक पदाधिकारी किती पावरफुल आहेत? हे ‘हॅलो बुलढाणा’ ने घेतलेल्या छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे. जनतेची काम देखील करीत नसलेल्या या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना मेळावा सुद्धा नियोजनपूर्वक घेता आला नसल्याची चर्चा यावेळी होती.
प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यभरात मार्गदर्शन मेळावे घेऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे, संघटन बांधणीचे काम हाती घेतले आहे.

दरम्यान मलकापूर मार्गावरील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,रोहिणी ताई खडसे, जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, नरेश शेळके आदी पदाधिकारी या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित होते. परंतु हा कार्यकर्ता मेळावा फ्लॉफ झाल्याचे चित्र होते. अत्यल्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. रिकाम्या खूर्ध्या पाहुन मान्यवरांनी भाषण थोडक्यात करून औपचारिकता केली. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाला झळाळी आणण्यासाठी आणखी खूप प्रयत्न करावे लागणार असल्याची यावेळी चर्चा रंगली होती.