Home जालना राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

102
0

आशाताई बच्छाव

1001940296.jpg

राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी जालना -मुरलीधर डहाके
दिनांक १२/०९/२०२५
याविषयी सविस्तर वृत्त असे की, येत्या १७ व १८ सप्टेंबर रोजी लातुर येथे होणाऱ्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर डहाके यांच्या उपस्थितीत व जिल्हा अध्यक्ष कृष्णा लहाने यांच्या अध्यक्षतेखाली पिंपळगाव रेणुकाई येथे १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसाठी जिल्ह्यातील संघटनेचे पुरुष व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये येणाऱ्या १७व१८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपली हजेरी या अधिवेशनाला लावावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अधिवेशनाला आम्ही सर्व प्रत्यक्षपणे हजेरी लावणार असल्याचा विश्वास व्यक्त केला व आणखी नवीन पदाधिकाऱ्यांसमवेत आम्ही या अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार असल्याचा मनोदय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.या बैठकीसाठी महिला पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली.
या बैठकीसाठी
प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर डहाके , अनिस पठाण ठेकेदार जिल्हा संघटक जालना, शालिकराम आहेर जिल्हा उपाध्यक्ष जालना, ज्योती बोर्डे जालना जिल्हा अध्यक्ष महिला, ज्ञानेश्वर नरवाडे ता.संघटक भोकरदन,मंजुषाताई सपकाळ ता.संघटक महीला भोकरदन,वंदना पाणपाटील तालुका सचिव भोकरदन, संगीताताई जाधव शाखा अध्यक्ष करंजगाव, दुर्गाताई बोरसे उपाध्यक्ष करंजगाव, यांच्यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here