आशाताई बच्छाव
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन
संपूर्ण लोकसभा मतदारसंघात शोककळा
हिंगोली .श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. नागेश पाटील आष्टीकर त्यांची धर्मपत्नी सौ. सुषमा नागेश पाटील यांचे आज (दि. 10 सप्टेंबर 2025) रोजी सकाळी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या व त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास मुंबई येथील हास्पिटल मध्ये घेतला त्यांच्या निधनाने हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुःख डोंगर कोसळला आहे.
अंतिम दर्शन व अंत्यविधी:
त्यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत मूळगावी आष्टी (ता. हदगाव, जि. नांदेड) येथे आणले जाणार असून उद्या (दि. 11 सप्टेंबर) सकाळी 10 वाजता आष्टी येथे त्यांच्या राहत्या घरी अंत्यविधी पार पडणार आहे. अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
सौ. सुषमा पाटील या अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळावू आणि दातृत्वशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांसोबतच समस्त समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांतता देवो. ओम् शांती।