Home गडचिरोली महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गडचिरोली यांचा अनोखा उपक्रम !

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गडचिरोली यांचा अनोखा उपक्रम !

202
0

आशाताई बच्छाव

1001927054.jpg

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गडचिरोली यांचा अनोखा उपक्रम !
श्री. गणेशोत्सव विसर्जना निमित्ताने आपल्या कर्तव्य बजावत असणाऱ्या सर्व पोलीस व कर्मचारी यांना संघटनेतर्फे पाणी बॉटल, फळ,बिस्किट वाटप

गडचिरोली शहराचे ठाणेदार चव्हाण साहेब यांनी स्व:ता श्री राहुल भैया दुबाले महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृहविभाग सदस्य यांना फोन करून संघटनेच्या कार्याचा केला विशेष कौतूक

 

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ : गडचिरोली शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आले होते. शनिवार ला श्री गणेश विसर्जन निमित्ताने शहरातील विविध ठिकाणाहून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आले.

पोलिस उपाशी राहू देणार नाही हा संकल्प जोपासत शहरातील विविध भागातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकी दरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन अहोराञ आपले कर्तव्य पार पाडत असताना तसेच बंदोबस्त वर असलेले पोलीस अधिकारी , कर्मचारी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॉम्प्लेक्स परिसर, चामोर्शी रोड, आरमोरी रोड, धानोरा रोड, व मूख्य इंदिरा गांधी चौक ते बाजार तलाव या परिसरातील तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सामाजिक आपुलकी जोपासत पाणी बॉटल ,बिस्कीट, फळे वाटप करण्यात आले व त्यांचे अडिअचणी जाणून घेतले.
या उपक्रमाला प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सन्माननीय निलोत्पल साहेब व श्री जगताप साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली तसेच श्री विनोद चव्हाण साहेब ठाणेदार गडचिरोली पोलीस स्टेशन यांचे संघटनेला प्रामुख्याने मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संदीप पैदापल्ली जिल्हा सचिव रोशन कवाडकर जिल्हा कार्याध्यक्ष सागर हजारे जिल्हा उपाध्यक्ष हारीस हकीम जिल्हा सहसचिव अक्षय इंगळे शहराध्यक्ष अनुराग कुडकावार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुरज गुंडमवार शहर सचिव मिथुन देवगडे शहर सहसचिव शुभम वानखेडे तालुकाध्यक्ष राजकुमार महावे तालुका उपाध्यक्ष संतोष पडिहार तालुका सचिव राकेश बच्चालवार व तसेच विशाल मदेशी राकेश पाल बंटी राठोड फिरोज लालनी प्रणय डबरे अंशुल जैन व सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleजनता विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
Next articleशासनाच्या नाविन्यपूर्ण लक्ष्मी मुक्ती योजना उपक्रमाचे व अनुसूचित जमाती करता विशेष शिबिराचे आयोजन पवनी येथे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here