आशाताई बच्छाव
शिवसेना उप तालुका प्रमुखपदी चेतन डिगांबर देशमुख यांची नियुक्ती
स्वप्निल देशमुख
वरवट बकाल, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा |
शिवसेनेचे नेते व भारत सरकारचे केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत, श्री. चेतन डिगांबर देशमुख यांची उप तालुका प्रमुख (रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर) पदावर नियुक्ती जाहीर केली आहे.
ही नियुक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांप्रमाणे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
श्री. देशमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये सक्रिय कार्य करत असून, त्यांची निष्ठा, जिद्द आणि सामाजिक कार्याची बांधिलकी याचीच दखल घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री. देशमुख यांच्याकडून पक्ष संघटनेचे कार्य अधिक जोमाने आणि निष्ठेने पार पडले जाईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.