Home बुलढाणा धक्कादायक ! शेतीच्या वादातून नातवानेच केला आजीचा खून; गळा आवळून केली हत्या...

धक्कादायक ! शेतीच्या वादातून नातवानेच केला आजीचा खून; गळा आवळून केली हत्या ! नांदुरा तालुक्यातील गोसिंग गावातील घटना..!

210

आशाताई बच्छाव

1001808818.jpg

धक्कादायक ! शेतीच्या वादातून नातवानेच केला आजीचा खून; गळा आवळून केली हत्या ! नांदुरा तालुक्यातील गोसिंग गावातील घटना..!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
नांदुरा :-बुलडाणा नांदुरा तालुक्यातील घटना शेतीच्या वादातून नातवानेच ७५ वर्षीय आजीचा गळा आवळून खून केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील गोसिंग येथे ५ ऑगस्ट रोजी घडल या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी ६ ऑगस्ट रोजी आरोपी नाताविरु गुन्हा दाखल करून त्याला अटक
केली आहे. अंजनाबाई ओंकार सुरडकर असे मृतक वृद्धेचे नाव आहे तर प्रविण शांताराम सुरडकर असे आरोपी नातवाचे नाव आहे.नांदुरा तालुक्यातील गोसिंग येथील अंजनाबाई सुरडकर यांच्या नावावर आठ एकर शेती आहे. यापैकी सहा एकर शेती आणि अर्धी पेंशन नावावर करण्याचा तग्गाप्य आरोपी प्रविण सुरडकर हा अंजनाबाईक लावत होता. मात्र, शेती नावावर करून देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या प्रविणनने आजीचा गळा आवळून खून केला. शेतात गेलेले कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी प्रविण सुरडकरला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपी प्रविण सुरडकरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.

Previous articleसंतापजनक ! दीड वर्षांच्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार ! आंबा खाण्याचे दिले होते आरोपीने आमिष
Next articleगोठ्याला आग अन् अनर्थ…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.