आशाताई बच्छाव
वसमत नप निवडणुकीच्या मोर्चा बांधणीला विद्यमान आमदार यांच्याकडून सुरुवात
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील
वसमत नगरपालिका निवडणुकीच्या ऐन वेळी वसमत शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश
वसमत नगरपालिकेच्या निवडणुकीला आता मोठ्या हालचालीला शहरातील अनेक भागात वेग आलेला पाहायला मिळत आहे विद्यमान आमदार राजू भैया नवघरे यांच्या विकास कामाचा वेग पाहून असंख्य नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज 30 जुलै रोजी मुंबई या ठिकाणी प्रवेश केला आहे यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षअजित पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत वसमत येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष वैजनाथराव गुंडाळे नगरपालिका प्रशासनाचे माजी कार्यकारी अभियंता रत्नाकर आडसरे .शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नगरसेवक दीपक हाळवे .शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नगरसेवक धनंजय गोरे. दिलीप भोसले .त्याचबरोबर वसंत चेपूरवार अशा अनेक नगरसेवकांनी आज मुंबई येथे जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व हसन मुश्रीफ आणि वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार राजू भाऊ या नवघरे यांच्या प्रमुख उपस्थित आज मुंबई येथे जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्यात आला याचबरोबर इतर पक्षातील कार्यकर्ते यांचा प्रवेश झाला आहे
येणाऱ्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती व त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षातील हालचालीला मोठा वेग आला आहे