Home मुंबई सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ...

सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत राज्यपालांना निवेदन

240

आशाताई बच्छाव

1001764871.jpg

मुंबई प्रतिनिधी दिपक कदम –सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री व आमदार यांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळांने महामहीम राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांना आज पत्र दिले.

राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाबद्दल माहिती पत्राद्वारे दिली. मंत्री संजय शिरसाठ, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे , राज्य मंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्या गंभीर प्रकरणाची वस्तुस्थिती स्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडली.

राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण, ठाणे बोरिवली बोगदा प्रकरण , मीरा भाईंदर महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत गैरव्यवहार अशा अनेक प्रकरण संदर्भात राज्यपाल यांना पत्राद्वारे माहिती दिली.

ह्यावेळी शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते विजय कदम, शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे, सचिव सुप्रदा फातर्पेकर, सचिव पराग डाके, आमदार ज. मो. अभ्यंकर, उपनेते आमदार मनोज जामसुतकर, उपनेते भाऊ कोरगावकर, उपनेते विठ्ठलराव गायकवाड, उपनेते नितीन नांदगावकर, उपनेते अशोक धात्रक, उपनेते आमदार नितीन देशमुख, उपनेते बबन थोरात, आमदार विभागप्रमुख महेश सावंत, आमदार बाळा नर आणि आमदार हारुन खान उपस्थित होते.

Previous articleशहरात राष्ट्रवादी पक्ष बळकट करा:- आदीक
Next articleधामोरी गावातील नागरिकांनी 150 ते 200 वर्षांपूर्वीची परंपरा ठेवली अबाधित दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे आगमन व विसर्जन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.