आशाताई बच्छाव
दभाषी फाट्यावर एसटी बस-ट्रकचा भीषण अपघात
दोन प्रवाशी ठार तर २६ जण जखमी; मृतांमध्ये बालिकेचा समावेश
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
महामार्गावरील शिंदखेडा तालुक्यातील दभाशी फाट्याजवळ आज दिनांक २९/०७/२०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास शिंदखेडा आगाराची एसटी बस आणि एका ट्रकची धडक झाली. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे २० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये आठ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. मुंबई-आग्रा
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा डेपोची (एम.एच. १४ बी.टी. २११२) शिरपूर-शिंदखेडा बस दभाशीमार्गे शिंदखेड्याकडे जात होती. दबाशी
गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर शिदखेड्याकडे वळण घेत असताना धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या एका ट्रकने (आरजे ११ जीसी ३४८७) एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बस सुमारे ३० फूट फरफटत रस्त्यावर थांबली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जबर जखमी झाले. जखमींना तातडीने धुळे आणि शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस चालकाला समोरून येणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा अप घात झाल्याचे बोलले जात आहे.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून दभाशी गावातील ग्रामस्थ आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी आणि रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तात्काळ मदत केली. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नरडाणा, शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. अपघातानंतर घटनास्थळी एसटी आगारातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली.
या अपघातात नुपूर गणेश सोनवणे या आठ वर्षीय बालिकेचा समावेश असून अन्य एक जण ठार झाला आहे. जखमींमध्ये वर्षा दिनेश पाळी (१८ रा. सोनशेलु), अश्विनी अमोल भावसार (दोंडाईचा), रेखाबाई चुडामण माळी (सोनशेलु), सुरेश मन्साराम माळी (शिरपूर), यमुनाबाई महारु बहार (शिरपूर), चैताली चुडामण माळी (सोनशेलु), अरुणाबाई संभाजी माळी (पाटण), रतिलाल सुका धनगर (अक्कलकुवा), निर्मलाबाई सुरेश माळी (पाटण), सुशिला विकास बोरसे (शिरपूर), बिलाल नवाब शेख
(शिरपूर), राहुल सुर्यकांत विंचूरकर (बस बाहक, धरणगाव), नाकीब सलीम खाटीक (शिरपूर), प्रफुल्ल शनेश्वर पवार (नेवाड), समीर शेख इस्माईल (शिरपूर), प्रविण गुलाब पाटील (अर्थ), जियाउद्दीन नवाबुद्दीन शेख (शिरपूर), रोहिणी रघुनाथ महिरे (शिरपूर), गोरख भालचंद्र पाटील (शिरपूर), (शिरपूर), इंदुबाई सिताराम माळी (सोनशेलु), दगुबाई आत्माराम माळी (सोनशेलु), शैलेंद्र प्रल्हादसिंग परदे-शी (शिंदखेडा), समीर शेख इसराई (शिरपूर), चैताली चुडामण माळी (सोनशेलु) आदींचा समावेश आहे.






