आशाताई बच्छाव
कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात होणार कॅन्सर रुग्णांचे मोफत निदान आणि उपचार कळवण, बाळासाहेब निकम प्रतिनिधी –तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे दि. 30 जुलै 2025 वार बुधवार रोजी कर्करोग डायग्नोस्टिक व्ह्यानमार्फत समस्त कळवण तालुक्यातील नागरिकांचे स्क्रिनिंग व कॅन्सर रुग्णांचे निदान आणि उपचार मोफत होणार आहे सदरील रुग्णांचे उपचार हे कॅन्सर सेंटर ऑफअमेरिका हॉस्पिटल नाशिक येथे होणार आहे.तसेच 31जुलै 2025 वार गुरुवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कनाशी येथे रुंग्णांची स्क्रिनिंग, निदान आणि उपचार होणार आहे. तेथील कॅन्सर रुग्णांना HCG मानवता हॉस्पिटल नाशिक येथे मोफत होणार आहे तरी कळवण तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सरकारी कॅन्सर व्ह्यान तपासणी मोहोमिचा लाभ घ्यावा. ही मोहिम सर्व जनतेसाठी मोफत आहे. या व्ह्यान मार्फत लोकांची मुख कर्करोग तपासणी, स्तन कर्करोग, गर्भाशय कर्करोग तपासणी, आणि इतर तपासण्या होणार आहेत. या मोहिमेसाठी जिल्हा शैल्याचिकित्सक मा. डॉ. चारुदत्त शिंदे. जि. आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप सूर्यवंशी, जि. कार्यक्रम व्यवस्थापक डॉ राहुल हडपे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत पवार सर. यांनी नागरिकांना आव्हान केले आहे. कर्करोग रोखण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. आणि लोकांनी पण या संधर्भात जागृत होणे आवश्यक आहे ही मोहीम पूर्ण जिल्ह्यात चालू आहे व रुग्णांची तपासणी आणि उपचार हे मोफत होत आहेत. म्हणून या मोहिमेचा लोकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा.