आशाताई बच्छाव
पिंपरी चिंचवड मध्ये सार्वजनिक आई कानबाई माता उत्सवाचे आयोजन
(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
पुणे–पिंपरी चिंचवड शहरात खान्देश वाशीयांसाठी, खान्देशातील संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा आणि वारसा अखंडीत ठेवण्यासाठी खान्देशचे आराध्य दैवत आई कानबाई माता उत्सवाचे यावर्षी आयोजन करण्यात आले आहे.
आपण सर्व खान्देश समाज बांधवांनी सहकुटुंब,सहपरिवार उपस्थित रहावे
अशी विनंती आई कानबाई माता उत्सव समितीने केलेली आहे…
या उत्सवासाठी प्रमुख आकर्षक म्हणून ह.भ.प.रविकिरण महाराज दोंडाईचेकर…
श्री नामदेव जाधव श्री सचिन सोनवणे (स्वरगंगा बँड नंदाने जिल्हा धुळे)
व त्याचबरोबर आई सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या शिरपूर मानाच्या रथाचे मानकरी सुपरहिट देवी भक्ती गीतांचे निर्माते व गायक खानदेशी कलाकार श्री.आबा चौधरी श्री.धीरज चौधरी (खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड शिरपूर)
उत्सवाची रूपरेषा खालील प्रमाणे राहील
शनिवार, दि. ०२ ऑगस्ट २०२५
सायं. ४ वा.
गहू दळणे (सप्तपुजन)
स्थळ: गणपती मंदिर,शिवनगरी, बिजलीनगर,चिंचवड,पुणे
रविवार, दि. ०३ ऑगस्ट २०२५
दुपारी २ ते ६ वा.
आई कानबाई मातेची भव्य मिरवणूक
सुरुवात: गणपती मंदिर,शिवनगरी, बिजलीनगर,चिंचवड,पुणे ते पी एम आर डी ए (PMRDA)मैदान वाल्हेकरवाडी पोलीस चौकी समोर
स्वरगंगा बँड, नंदाणे – धुळे
सर्व कानबाई भक्तांना खालील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करावे…..
(ज्या महिला भगिनींना शक्य असेल त्यांनी नऊवारी साडी व पुरुषांनी पारंपरिक वेश परिधान करावा.(
(काळ्या रंगाचे कपडे टाळावेत ही विनंती.)
सायं. ६ वा.
देवीची प्रतिष्ठापना
स्थळ:- पी एम आर डी ए (PMRDA) मैदान वाल्हेकरवाडी पोलीस चौकी समोर
६ ते ७: मान्यवरांचा सन्मान
७ नंतर: मातेचे दर्शन व महाप्रसाद
विशेष सादरीकरण:
श्री. आबा चौधरी व धिरज चौधरी टीम प्रस्तुत – मातेचा जागर व सांस्कृतिक कार्यक्रम
सोमवार, दि. ०४ ऑगस्ट २०२५
सकाळी ८ वा.
आई कानबाई मातेची विसर्जन मिरवणूक
सुरवात :- पी एम आर डी ए (PMRDA)मैदान ते
समारोप: जाधव घाट, रावेत
स्वरगंगा बँड – नंदाणे, धुळे
(सहकार्य व व्यवस्थापन)
खान्देशातील सर्व समाज बांधवांचे एकत्रित योगदान: खान्देश मराठा समाज बांधव, माळी समाज बांधव,,राजपूत समाज बांधव,,धनगर समाज बांधव, लेवा समाज बांधव,बौद्ध समाज बांधव,,गुजर समाज बांधव,,नाभिक समाज बांधव,,वाणी समाज बांधव,,तेली समाज बांधव,,कुंभार समाज बांधव,,सोनार समाज बांधव,,कोळी समाज बांधव,,लोहार समाज बांधव,,शिंपी समाज बांधव,,पांचाळ समाज बांधव,,परीट समाज बांधव,,ब्राह्मण समाज बांधव ,,टोकरी समाज बांधव ,,बारी समाज बांधव,,मातंग समाज बांधव,मुस्लिम समाज बांधव ,बंजारा समाज बांधव,,वंजारी समाज बांधव,,सुतार समाज बांधव ,,भोई समाज बांधव ,,मातंग समाज बांधव ,,चर्मकार समाज बांधव
मुख्य संयोजक / आयोजक
समस्त खान्देश समाज बांधव आई कानबाई माता उत्सव समिती,
कानबाई माता चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी चिंचवड शहर पुणे परिसर