Home बुलढाणा शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय युवकाचा डोहात बुडून मृत्यू ! अंढेरा येथील...

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय युवकाचा डोहात बुडून मृत्यू ! अंढेरा येथील घटना …

87

आशाताई बच्छाव

1001712806.jpg

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय युवकाचा डोहात बुडून मृत्यू ! अंढेरा येथील घटना …
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-चिखली तालुक्यातील अंढेरा फाट्यानजीकच्या डोहात बुडून एका १६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रणव केशव इंगळे असे मृत युवकाचे नाव असून, तो नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी गेला असताना हा प्रकार घडला.प्रणव दुपारी शौचासाठी जात असताना त्याचा पाय घसरून तो मारुती मंदिराच्या उत्तर दिशेला आल्याने तो पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस ठाण्याचे गजानन वाघ व नितीन पुसे यांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा केला. ठाणेदार रूपेश शक्करन यांनी रुग्णालयात जाऊन मृत्युप्रकरणाची माहिती घेतली.प्रणवच्या पश्चात वडील केशव इंगळे, आई, ए५. बहीण असा परिवार असून त्याच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त केला जात आहे.

Previous articleअमरावती शहरात मध्य प्रदेशातील स्वस्त दारूचे विदेशी बाटलीतून विक्री : गुन्हे शाखेने 3 लाख १४ हजाराची दारू जप्त केली.
Next articleलम्पीने 4 गाई 2 वासरू दगावले! पशुवैद्यकीय दवाखाना बंद, डॉक्टर बेपता !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.