Home गडचिरोली विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन

189

आशाताई बच्छाव

1001712722.jpg

विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक

माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन

विद्याभारती हायस्कूल गोगाव येथे विद्यार्थ्यांची मोफत रक्त गट तपासणी

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ : 

इनर व्हील क्लब ऑफ गडचिरोली , सिटी हॉस्पिटल व विद्याभारती हायस्कूल गोगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याभारती हायस्कूल गोगाव येथे काल दि १५ जुलै २०२५ रोजी रक्त गट तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांची मोफत रक्त गट व आरोग्य तपासणी करण्यात आली.

आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून इनर व्हील क्लब ऑफ गडचिरोली च्या जिल्हाध्यक्ष वैशाली बटटूवार, डॉ.खुशबू दुर्गे, विद्याभारती हायस्कूल गोगाव च्या मुख्याध्यापिका प्रतिभाताई रामटेके, इनर व्हील क्लब च्या कोषाध्यक्ष सरस्वती परतानी, सचिव शालूताई भुसारी, उपाध्यक्ष शिल्पा हेमके, ममता बियाणी,व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ खुशबू दुर्गे व त्यांच्या चमू द्वारे वर्ग ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व रक्त गट तपासणी करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करतांना माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी शालेय विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे त्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. इनर व्हील क्लब व सिटी हॉस्पिटल ने एक चांगला उपक्रम सुरू केला असून त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगीतले. आरोग्य शिबिराप्रसंगी इनर व्हील क्लब चे पदाधिकारी, सदस्य सिटी हॉस्पिटल चे कर्मचारी व विद्याभारती हायस्कूल गोगाव चे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.