आशाताई बच्छाव
स्क्रॅब दुकानातून रोख रकमेसह स्क्रँब चोरी करणारे दोघे चोरटे चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात – 3 फरार..
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – शहरातील घटरोड वरील साबीर स्क्रॅब दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्यांनी दुकानातील 40 हजार रूपये रोख रकमेसह 30 हजार रूपये किमतीचे 30 किलो केस चोरी केल्याची घटना दि 9/7/25 रोजी सायंकाळी 7-30 ते 10/7/25 रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान घडली होती याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजय मालचे करीत होते.
गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजय मालचे, पो कॉ नितीन आगोणे, रवींद्र बच्छे, आशुतोष सोनवणे व जामनेर पोलिस ठाण्याचे पो कॉ अमोल पाटील यांनी दि 12/7/2025 रोजी आरोपी आलमगीर शेख रफीक 38 रा मदनी नगर जामनेर व हकीम खान रफीक खान 29 रा पहूर पेठ पहूर ता जामनेर यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांनी चोरी केलेले 13 किलो हेअर सक्रॅप (केस) काढून दिले असून त्यांच्याकडून महिंद्रा बोलेरो
Mh 04 hy 6253 ही गाडी हस्तगत केली आहे. 3 आरोपी फरार असून रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि फरार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.