आशाताई बच्छाव
देवळा प्रतिनिधी भिला आहेर :- महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत माननीय नायब तहसीलदार श्री. बबन अहिरराव यांच्या अध्यक्षतेखाली दाखले वितरण हा कार्यक्रम आपल्या जिजामाता माध्यमिक विद्यालय दहीवड येथे घेण्यात आला.
सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत – स्वागत गीताने करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भामरे सर यांनी केले व प्रास्ताविक तलाठी श्री .विकास अहिरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून माननीय नायब तहसीलदार श्री. बबन अहिरराव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठी आवश्यक असणारे दाखले व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र व त्याच बरोबर आ.भा. कार्ड ,माता बाल संगोपन योजना, आदिवासी बांधवांसाठीच्या योजना इ. योजनांविषयी माहिती दिली. व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणाऱ्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले याप्रसंगी मंडल अधिकारी श्री डोके सर ,सरपंच श्रीमती पुष्पा पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री गणेश देवरे, ग्रामपंचायत सदस्य , पालक वर्ग, गावातील नागरिक, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सागर सर, कोतवाल श्री बापू अहिरे, ई महा सेवा केंद्राचे चालक सागर सोनवणे,श्री. खैरनार, श्री निकम बी. एस, श्री. आहेर एस. के. श्री आहेर के. एस. श्री निकम एस. डी. श्री शिंदे व्ही बी श्रीमती पाटील बी. एस. श्री. मनेष ब्राह्मणकार व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.