आशाताई बच्छाव
पिंपळनेरमध्ये गोमांस तस्करीचा पर्दाफाश: 1500 किलो गोमांस जप्त, दोघांना अटक
धुळे नंदुरबार संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ
पिंपळनेर पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत गोमांस तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. एका पिकअप वाहनातून तब्बल १५०० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गोमांसाची अंदाजित किंमत २ लाख २५ हजार रुपये आहे, तर पिकअप वाहनाची किंमत ४ लाख रुपये आहे.
१३ जुलै २०२५ रोजी रात्री साडेचारच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक
किरण बर्गे यांच्या पथकाने गस्त घालत असताना, MH.०३ C.V. ८८५३A या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप गाडीला थांबवले. चौकशी केली असता, चालकाने सय्यद जाविद सय्यद (वय २६, रा. पवारवाडी, मालेगाव, नाशिक) आणि क्लिनरने मोहम्मद असद अब्दुल अझीझ शेख (वय २४, रा. कसैवाडा, कुर्ला पूर्व, मुंबई) अशी आपली ओळख सांगितली. मात्र, गाडीतील मालाबाबत
त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
पोलिस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांनी गाडीची तपासणी केली असता, गाडीच्या खालच्या बाजूला गोणीमध्ये जनावरांचे मांस भरलेले आढळले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश हेमाडे यांनी तपासणी केल्यानंतर ते गोमांस असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पी.एस.आय. संदीप संसारे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.