आशाताई बच्छाव
दोन साथीदारासह बळजबरीने खिशातील दहा हजार रु. व आय फोन मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या महिला आरोपीस जेरबंद करुन 95,000/- रु. किंमती मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाई
जाफ्राबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
पोलीस ठाणे बदनापूर येथे दिनांक 30/06/2025 रोजी फिर्यादी नामे उद्धव निवृत्ती बनकर वय 38 वर्ष राहणार सातेफळ तालुका जाफराबाद ह. मु.देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांनी पोलीस ठाणे बदनापूर येथे फिर्याद दिली होती की एक अनोळखी महिला हिने फिर्यादी कडून QR कोडवर पाच हजार रुपये मागवून दोन अनोळखी व्यक्तींच्या साह्याने पूर्वतयारी करून कट करून फिर्यादीच्या स्कार्पिओ गाडी मध्ये बळजबरीने घुसून फिर्यादीस मारहाण करून बळजबरीने फिर्यादीच्या खिशातील दहा हजार रुपये व ॲपल कंपनीचा आयफोन हिसकावून घेऊन घटना कोणाला सांगितली तर जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात एक महिला व दोन अज्ञात आरोपीतां विरुद्ध पोलीस ठाणे बदनापूर येथे गु. र. नं.235/2025 कलम 309(4)भा. न्या. सं. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता
त्या अनुषंगाने दिनांक 11/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमूद गुन्ह्यातील अज्ञात महिला व दोन अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारा मार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा महिला नामे 1)सपना संतोष निकाळजे वय 22वर्ष रा. पांग्री उगले ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा. हिने तिचे दोन पुरुष साथीदार यांचे सह केल्याचे निष्पन्न झाल्याने तिस ताब्यात देऊन तिने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने तिचे कडून 15000/- रु. रोख ज्यात फिर्यादी कडून QR कोडवर मागितलेली 5000/-रुपये व फिर्यादीचे खिशातील बळजबरीने हिसकावलेले 10,000/-हजार रु. रोख व 80,000/-रु. किमतीची फिर्यादीचा एक आय iphone 15 मोबाईल व ओपो कंपनीचा मोबाईल असे एकूण 95,000/- रुपये कींमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमूद महिला आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे बदनापूर यांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभाग जालना श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सपोनि योगेश उबाळे, पोऊपनी राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार गोपाल गोषिक, लक्ष्मीकांत आडेफ, फुलचंद गव्हाणे, देविदास भोजने, सागर बाविस्कर, सतिश श्रीवास, आकृर धांडगे, कैलास चेके, भागवत खरात, चालक अशोक जाधव व महिला पोलीस अंमलदार चंद्रकला शडमल्लू, कल्पना बांडे, कविता काकस, अरुणा गायकवाड, सत्यभामा उबाळे यांनी केली आहे.