आशाताई बच्छाव
वरवंड ग्रामपंचायत मध्ये लाखोचा भ्रष्टाचार, नंतर चौदावा वित्त आयोगाचं रेकॉर्ड गायब! तरी ही शासन ग्रामपंचायतच रेकॉर्ड गायब करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करेना….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथील ग्रामपंचायत विरोधात 13 जानेवारी 2021 रोजी वरवंड येथील अशोक चावरे व प्रकाश जेऊघाले यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगत मताने भ्रष्टाचार केल्याची तक्रार केली होती. यांच्या तक्रारीवर शासनाने विचार करून केलेल्या कामाची जागेवर जाऊन पाहणी केली नंतर ज्या कर्मचाऱ्यांनी त्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ सांभाळलेला होता त्यांना नोटीस देऊन वरवंड येथे हजर राहण्याचे सांगितले होते.त्यावेळेस ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मगर मॅडम, शिंदे मॅडम, शिंदे साहेब आणि बोबडे साहेब यांना वरवंड येथील ग्रामपंचायतने केलेल्या कामाची पाहणी करून सदर अहवाला तक्रारकर्त्यांसह सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या त्यावेळेस विस्तार अधिकारी गीते साहेब व जाधव साहेब हेही उपस्थितीत होते ग्रामपंचायत वरवंड येथे सदर भ्रष्टाचारावर चर्चा करण्यात आली नंतर विस्तार अधिकारी सह गट विकास अधिकारी यांच्या समक्ष वरवंड येथील केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सिद्ध झाला त्यावेळेस गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे विस्तार अधिकारी यांच्या सहीने ज्या कामांमध्ये असावयव झालेला आहे त्याचे पत्र तक्रारकर्त्यासह जिल्हा परिषद सिओ यांनाही देण्यात आले. त्या पत्रामध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी संगतमताने भ्रष्टाचार झाल्याची सिद्ध करण्यात आले होते. पण शासनाच्या दिरंगाईमुळे गेल्या दोन ते तीन वर्षापासून भ्रष्टाचार केलेली रक्कम शासनाच्या खात्यात जमा न करता शासनाची दिशाभूल करण्याचे काही अधिकारी काम करत आहे. पण शासनाला गेल्या दोन ते तीन वर्षापासून वारंवार तक्रार केल्या जात आहे पण या विभागातील काही अधिकारी कागदाला कागद लावुन तक्रारकर्त्यांची व शासनाची दिशाभुल करून हे प्रकरण दाबण्याचे काम करीत आहेत.