आशाताई बच्छाव
हीच ती १९३२ निर्मित गणपतीची यादगार मूर्ती
नवनिर्माण मंदिर बांधणीला झाली सुरूवात : १३२ वर्ष जूने आहे मुख्य साकोलीतील हे प्राचीन मंदिर • येत्या २७ ऑगस्टला संकट चतुर्थीला नवे मंदिराचा शानदार शुभारंभ •
संजीव भांबोरे
भंडारा -साकोली येथील इंग्रजांच्या राजवटीत सन १९३२ मध्ये उभारलेले मुख्य शहर साकोली गणेश वार्डातील श्री गणपती मंदिर आता फक्त फोटोतील “आठवणीच पान” राहणार आहे. तर येथे लवकरच येत्या २७ ऑगस्टला संकट चतुर्थीच्या पावन पर्वावर नवनिर्माण संगमरवरी मंदिर उभारणीचे बांधकाम कार्य ( गुरू. ०३ जुलै ) पासून सुरू झाले आहे. यासाठी शहरातील सर्व राजकीय पुढारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि श्री बाल गणेश उत्सव मंडळ विशेष प्रयत्नशिल आहेत हे विशेष.
तब्बल १३२ वर्ष जूने प्राचीन श्री गणपती मंदिर हे त्याकाळी तहसिल शहर असलेले गणेश वार्डात स्थापित आहे. शहरातीलच नव्हे तर विदर्भातील अगदी प्राचीन श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार सौभाग्याचा “आशिषं” येथील कर्तव्यदक्ष जनतेला प्राप्त झाले. येथे लोकवर्गणीतून राजस्थान शिल्पकार निर्मिती नक्षीकामातील श्री गणेश मंदिराची निर्मिती केली जात आहे. आठ दिवसांपूर्वी हे प्राचीन मंदिर मोठ्या सुरक्षेत पाडण्यात आले. येथे येणाऱ्या २७ ऑगस्टला संकट चतुर्थीच्या पावन पर्वावर नवे मंदिर भक्तांसाठी उभे असणार आहे. म्हणजेच दहा दिवसीय श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवसीय हा नवनिर्माण मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होणार असल्याचे संकेत दिले आहेत. येथील प्राचीन मुर्ती ही सन १९३२ या ब्रिटिशकालीन राजवटात राजस्थान वरून सौंदड रेल्वे येथे त्या काळच्या वाफेवर चालणाऱ्या रेल्वेने आणले होते हे येथील ऐतिहासिक वैभव प्राप्त आहे.
दोन दिवसांपासून मुख्य शहर गणेश वार्डातील या मंदिर स्थळी नवनिर्माण मंदिराचा जिर्णोद्धाराचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे. यात नगरपरिषद, महावितरण, जि. प. केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ चे अतुल्य सहकार्य लाभले आहे. सदर नव्या श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार सहकार्याला शहरातील राजकीय पुढारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, श्री गणेश मंदिर समिती व श्री बाल गणेश उत्सव मंडळातील पदाधिकारी आणि सदस्यगण हे अथक परिश्रम घेत आहेत.






