आशाताई बच्छाव
दैनिक युवा मराठा न्यूज़ पुणे जिल्हा ब्यिरो चीफ श्री प्रशांत नागणे आज दिनांक १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी खेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचा कार्यक्रम छत्रपती सभागृह पंचायत समिती खेड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला श्री.सुनील भोईर सहायक गट विकास अधिकारी खेड,श्री.प्रमोद बनकर तालुका कृषी अधिकारी खेड,श्री.विजय गारगोटे संचालक सिल्कबेरी शेतकरी उत्पादक कंपनी वाकी बु.,श्री संजय फुले जिल्हा रेशीम अधिकारी पुणे,श्री.मृण्मय बाबाजी काळे हे उपस्थीत होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पुणे मॉडेल स्कूल प्रोजेक्ट मधील 35 शाळांना कृषी दिनानिमित्त परसबागेचे बियाणे कीट उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षक ग्रामपंचायत अधिकारी यांना वाटप करण्यात आले.तसेच खरीप पीक स्पर्धे२०२४-२५ मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त शेतकरी यांचा सत्कार व प्रमाणपत्रे प्रदान कार्यक्रम श्री.मृण्मय बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भात सर्वसाधारण गट श्री. ज्ञानेश्र्वर महादू डांगले पाईट,प्रथम श्री.विश्वनाथ कृष्णा खंडाळकर आडे,द्वितीय श्री.राजेंद्र किसन वाळुंज आव्हाट,तृतीय भात आदिवासी गट श्री.पांडुरंग जानकु साबळे साकुर्डी, प्रथम श्री.सुभाष चंदर डवने नायफड,द्वितीय श्री.पांडुरंग मारुती लांघी,तृतीय शिरगाव सर्वसाधारण गट पीक सोयाबीन यामध्ये श्री.अशोक गोविंद भोकसे कुरकुंडी प्रथम श्री.बाजीराव गोविंद डांगले पाईट द्वितीय,श्री.रमेश गणपत लोखंडे.कनेरसर तृतीय क्रमांक प्राप्त शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर श्री संजय फुले साहेब यांनी रेशीम शेती विषयी व डॉ.दत्तात्रय गावडे यांनी सोयाबीन पीक व्यवस्थापन याविषयी उपस्थित शेतकरी यांस मार्गदर्शन केले.श्री प्रशांत नागणे अग्रीहिता ग्रुप ऑफ कंपनीस सीएमओ यांनी बांबू शेती बद्दल सखोल मार्गदर्शन केला, श्री जालिंदर थोरवे यांनी स्ट्रा बेरी लागवड बाबत शेतकऱ्यांना योजना ची माहिती व मार्गदर्शन केला विजय खेडकर कृषि अधिकारी पंचायत समिती खेड यांनी कार्यक्रम चा सूत्र संचालन केला, श्री शिवप्रसाद वांगंस्कर श्रीमती स्वाती भोईरकर विस्तार अधिकारी (कृषि ) श्रीमती अनिता शिंदे विस्तार अधिकारी (शिक्षण ) पंचायत समिती खेड ह्या उपस्थित होत्या शेवटी श्री सुनील भोईर सहायक गट विकास अधिकारी खेड यांनी आभार प्रदर्शन केले.