Home नागपूर दीक्षाभूमी नागपूर येथे दीक्षाभूमीचे सौंदर्यकरण करा या मागणीला धरून भव्य धरणे आंदोलन

दीक्षाभूमी नागपूर येथे दीक्षाभूमीचे सौंदर्यकरण करा या मागणीला धरून भव्य धरणे आंदोलन

176

आशाताई बच्छाव

1001657547.jpg

दीक्षाभूमी नागपूर येथे दीक्षाभूमीचे सौंदर्यकरण करा

या मागणीला धरून भव्य धरणे आंदोलन

पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष घेतलेली मुलाखत

नागपूर (दीक्षाभूमी ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली .आज जवळपास 69 वर्ष पूर्ण होत आहेत ..परंतु दीक्षाभूमी या ठिकाणी पाहिजे त्या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत .आज दिनांक 1 जुलै 2025 ला पत्रकार संजीव भांबोरे यांनी दीक्षाभूमीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पोटतिडकेने सांगितले की,आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सौंदर्यकरण झालेलं नाही. जे दीक्षाभूमी येथे सौंदर्य करण होते त्याला विद्रूप करण्यात आले . आणि ही मागणी 2024 पासून सुरू आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की,आंदोलन याकरिता की बाहेर देशातून किंवा भारताच्या विविध राज्यातून या ठिकाणी दर्शनार्थ येतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी धम्मदीक्षा देऊन तथागत गौतम बुद्धाचा धम्म दिला . आणि येथून बुद्धाच्या विचार पवित्र दीक्षाभूमी येथे येणारे पर्यटक प्रेरणा घेऊन जातात. याकरिता बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना
राहण्याची व्यवस्था नाही ,त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाही , गाड्या पार्किंगची व्यवस्था नाही. या सर्व सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे याकरिता 2024 पासून वर्षीपासून आंदोलन सुरू आहे. त्याला एक वर्ष पूर्ण झाले. एक वर्षांपूर्वी देवेंद्र देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितले होते की
आम्ही 24 कोटी खर्च करून सौंदर्य करण आणि विस्तारीकरण करू असे सांगितले.आणि माता कचेरी यांच्या परिसरातील सहा एकर जागा आणि कॉटन रिसर्च सेंटर यांच्या पाठीमागची 16 एकर जागा अशी 21 एकर जागा दीक्षाभूमीवर येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांच्या व्यवस्था करिता देण्याची घोषणा केली होती परंतु ती घोषणा हवेतच विरली. त्यामुळे दीक्षाभूमी येथे एक दिवसीय निदर्शने करण्यात आले. त्याचप्रमाणेअंबाझरी तलाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सांस्कृतिक सभागृह होते ते तोडण्यात आले परंतु ते पुन्हा त्या ठिकाणी उभारण्यात यावं अशी सुद्धा मागणी विशाल आर्यबोधी विजय पाटील भगवान कांबळे, विजय मेश्राम भारतीय बौद्ध महा शाखा सरचिटणीस नागपूर जिल्हा ,इंजिनीयर पद्माकर गणवीर राष्ट्रीय संघटक भारतीय बौद्ध महासभा, विनय डोके भारतीय बौद्ध महासभा संस्कार उपाध्यक्ष नागपूर लक्ष्मीकांत मेश्राम संघटक नागपूर ,डॉक्टर तपशील वासनिक ,आनंद सायरे ,गंगाधर कांबळे ,रावसाहेब पाटील, एडवोकेट व्ही .पी पानतावणे,संघटक नागपूर जिल्हा ,कुंदलता मानोटकर, पपीता खोब्रागडे, व्ही के हिवराडे ,तक्षशिला वाघधरे,प्रतिमा तिरपुडे ,उज्वला गणवीर ,असंख्य बौद्ध उपासक उपासिका यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleकृष्णा बोरकर यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा
Next articleहिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील वाचन प्रेमी शाळेतील 75 अनाथ,एकल पालक विद्यार्थ्यांचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.