Home बुलढाणा केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव व राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक...

केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव व राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक …! लोणार आणि मेहकर तालुक्यातील अतिवृष्टीबाधीतांच्या मदती संदर्भात झाली चर्चा …!!

48

आशाताई बच्छाव

1001656641.jpg

केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव व राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक …! लोणार आणि मेहकर तालुक्यातील अतिवृष्टीबाधीतांच्या मदती संदर्भात झाली चर्चा …!!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलढाणा अतिवृष्टीमुळे लोणार आणि मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासंदर्भात आज मुंबई येथे केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव आणि महसुल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यात बैठक झाली या बैठकीत महसुल मंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्य मदतीसंदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे. 26 जुन रोजी बुलढाणा जिल्हयातील लोणार आणि मेहकर तालुक्यात ढगफूटी सदृष्य पाऊस पडला. या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाच्या पाण्यासोबत खरडुन गेल्या.शेतजमिनीत वाळुचे व दगडाचे ढिग साचल्या गेले. 27 जुन ला केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांना या संदर्भाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 28 व 29 जुन ला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीने बाधीत झालेल्या क्षेत्राचा दौरा केला होता. त्यानंतर 30 जुन ला केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव हे मुंबई दौऱ्यावर असतांना त्यांची मंत्रालयात राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये केंद्रिय मंत्री झालेल्या नुकसानीची माहिती महसुल मंत्र्यांना दिली. सोबतच अतिवृष्टीने बाधीत क्षेत्राचे छायाचित्र महसुल मंत्र्यांना दाखवुन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दाहकता त्यांच्या निदर्शनास आणुन दिली.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने भरघोस मदत देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव हे बाधीत क्षेत्राच्या दौऱ्यावर असतांनाच झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन अहवाल तयार करत आहेत. आज केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीनंतर मंत्रालय स्तरावरुनही तात्काळ अहवाल शासनाला सादर करण्याचे सुचित करण्यात आले आहे.

Previous articleEXCLUSIVE एलसीबीची खुर्ची आता सुनील अंबुलकरांकडे! – अशोक लांडे यांची CRO ला रवानगी !
Next articleरेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन मिळत नसल्याचा आरोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.