Home बुलढाणा विष्णूवाडी चौक झाला हड्डीतोडी चौक !! 10 मिनिटात घसरून पडले 12 जण…

विष्णूवाडी चौक झाला हड्डीतोडी चौक !! 10 मिनिटात घसरून पडले 12 जण…

41

आशाताई बच्छाव

1001656585.jpg

विष्णूवाडी चौक झाला हड्डीतोडी चौक !! 10 मिनिटात घसरून पडले 12 जण…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलडाणा संत
गजानन महाराजांचे मंदिर असलेला विष्णूवाडी चौक पार खराब झाला आहे. पावसानंतर उखडलेल्या रस्त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून या खड्डयांमध्ये पाणी भरले आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा अंदाज नसल्यामुळे दहा मिनिटातच जवळपास 12 जण घसरून पडल्याची घटना आज सकाळी घडली. त्यामुळे विष्णूवाडी चौक आता हड्डीतोडी चौक झाला की काय? अशी अवस्था निर्माण झाली आहे.बस स्टॅन्ड कडून सर्क्युलर रोड कडे जात असताना विष्णूवाडी चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्कुलर रोडवरील इतर सर्व भागांमध्ये जाण्यासाठी या चौकाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. विशेष म्हणजे याच परिसरामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध न्यायाधीशांचे सरकारी निवासस्थान आहे. संत गजानन महाराजांचे प्रसिद्ध मंदिर याच चौकात असल्यामुळे भक्तांची ही गर्दी चौकाला गजबजविणारी आहे. तशा अर्थाने व्हीआयपी असलेला हा चौक सुविधांच्या बाबतीत फटीचर आहे. शहरात जयस्तंभ चौकानंतर हा एक मात्र असा चौक आहे ज्या ठिकाणी सहा रस्ते येऊन मिळतात. बाजूलाच असलेल्या चैतन्य वाडी परिसरामध्ये कोचिंग क्लासेसचा हब तयार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी ही या चौकातून नेहमी पाहत असते. मागील अनेक दिवसांपासून विष्णूवाडी चौकामध्ये खोलगट भाग तयार झाला आहे. सर्व रस्त्यांवरून येणारे पाणी याच ठिकाणी साचत राहते. परिणामी मोठे मोठे खड्डे तयार झाले आहेत. मुरूम टाकून हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झाला परंतु हा तुटपुंजा उपाय फार का टिकू शकला नाही. मागील आठवडाभरापासून बुलढाण्यात पडत असलेल्या पावसामुळे विष्णूवाडी चौकाची दाणादाण उडाली आहे. चौकाला खड्डयांचे वैभव पुन्हा प्राप्त झाले आहे. आज सकाळी या चौकामध्ये येणारे जाणारे घसरून पडलेत. दोन ते तीन वेळा विविध फंडामधून चौकामधील रस्ते झालेत. रस्त्यांचा दर्जा मात्र खड्डयांमुळे उघडा पडला आहे. नगर प्रशासनाने तात्काळ सदर चौकामध्ये खड्डे बुजवण्याची व्यवस्था करून किमान इतर नागरिकांना पडण्यापासून वाचवावे, अशी मागणी पडणारे नागरिक करीत आहेत.

Previous articleगजानन कवळासे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार शिवभक्तावरील हल्ला प्रकरणात नागपूर खंडपीठात याचिका
Next articleEXCLUSIVE एलसीबीची खुर्ची आता सुनील अंबुलकरांकडे! – अशोक लांडे यांची CRO ला रवानगी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.